जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर तहसीलदार सुषमा पाटील यांची धडाकेबाज एन्ट्री तर दुसरीकडे मुख्याधिकारी पल्लवी पाटील आणि गिरीश दापकेकर यांची आदेशाच्या अंमलबजावणीला नो एंट्री…?



प्रतिनिधी
अनमोल कांबळे

देशभरात पर्यटनासाठी प्रसिद्ध असणारा व थंड हवेचे ठिकाण मानला जाणारा संपूर्ण महाबळेश्वर तालुका हा इको सेन्सिटिव्ह झोन मानला जाणारा तालुका असल्याने महाबळेश्वर तालुक्यामध्ये जंगल तोडून सिमेंटचे जंगले उभारणाऱ्या धनदांडग्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी चांगलाच वाईचा घाट दाखवत महाबळेश्वर तालुक्यातील अनधिकृत बांधकामे पाडा व तिथे असणारे वीज कनेक्शन खंडित करा असे आदेश देताच महाबळेश्वरच्या तहसीलदार सुषमा चौधरी पाटील या ॲक्शन मोडमध्ये आल्या असून अनधिकृत बांधकामांना नोटीस देत थेट कारवाई करण्याचेच धोरण हातामध्ये घेतल्याने स्थानिक एजंटांसह मुंबई मे बैठे हुऐ सेट किबी खुर्ची हलवण्याचे काम तहसीलदार सुषमा पाटील यांनी केल्याचे दिसून येत आहे तर दुसरीकडे संपूर्ण तालुक्यामध्ये आदेशाच्या अंमल बजावणीचं काम असताना देखील महाबळेश्वर नगर परिषदेच्या मुख्य अधिकारी पल्लवी पाटील आणि पाचगणी नगरपालिकेचे मुख्याधिकारी गिरीश दापकेकर हे मात्र कुठल्याही प्रकारची कारवाई करत असताना दिसून येत नाहीत परंतु जेव्हापासून जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश आला आहे तेव्हापासूनच दोन्हीही नगरपालिका कार्यालयांमध्ये शेडजी भडजींच्या भेटीगाठींची जनु जत्रा चालू असल्याचे चित्र दिसायला लागले आहे महाबळेश्वर मध्ये लेख परिसर गणेश नगर सोसायटी शेत्र महाबळेश्वर रस्ता व त्याचप्रमाणे पाचगणी मध्ये पारसी पॉइंट परिसर ब्ल्यू कंट्री ची मागची बाजू या ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणात जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला कचऱ्याचा डब्बा दाखवत आदेशाची पायमल्ली करण्याचे काम चालू झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे, परंतु आता बघायचे इतकंच आहे, की जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला दाखवलेली केराच्या टोपलीतूनच या एकतर्फी धोरणाचा विस्फोट होणार आहे का? असा असणारा प्रश्न सर्वसामान्यांच्या मनामध्ये उद्भवलेला आहे, ‌