दारूच्या नशे मध्ये गुंग असणाऱ्या पाचगणी नगरपरिषदेचे मुख्य अधिकारी गिरीश दापकेकर यांनी महाराष्ट्र नागरीक सेवा अधीनीयम कलम १९८९. नुकसान कायद्याचा भंग केला असल्याने त्याची तात्काळ शहरातून हकालपट्टी करून त्याच्या वरती निलंबनाची कारवाई करा अनमोल कांबळे यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी तक्रारीच्या माध्यमातून मागणी



प्रतिनिधी सातारा

नुकताच जिल्ह्यामध्ये चर्चेचा विषय राहिलेला व संपूर्ण जिल्ह्यामध्ये गाजत असणारा पाचगणी नगर परिषदेचे मुख्य अधिकारी गिरीश दापकेकर यांचा बार मध्ये दारू पिऊन धिंगाणा घालत असणारा व्हिडिओ हा व्हायरल झाला असून या व्हिडिओमध्ये पाचगणी नगरपालिकेचा ब्लॅक लिस्टमध्ये असणारा ठेकेदार सुनील सनबे हा मुख्याधिकारी गिरीष दापकेकर यांना दारू पाजत असल्याचे चित्र दिसत आहे गिरीश दापकेकर यांनी महाराष्ट्र नागरीक सेवा अधीनीयम कलम १९८९. नुकसान कायद्याचा भंग केला असल्याने त्याची पाचगणी शहरातून नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी पदावरून तात्काळ हकालपट्टी करून त्यांची चौकशी होईपर्यंत निलंबित करण्यात यावे अशी मागणी अनमोल कांबळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी स्वरूपात केली असून अनेक मुख्याधिकारी बघितले वरिष्ठ अधिकारी बघितले परंतु ब्लॅक लिस्टमध्ये असणाऱ्या ठेकेदारासोबत दारू पिणारे मुख्यअधिकारी हे आम्ही पहिल्यांदाच बघितले आहेत मुख्याधिकाऱ्यांविषयी काहीही लिहिलं तर मुख्याधिकारी बेकायदेशीर काम करणाऱ्या ठेकेदारांना सांगून तक्रारदाराविरुद्ध पोलीस स्टेशनला जावा मी फोन करतो ते संबंधिताविरोधात खोट्या तक्रारी एन सी दाखल करून घेतील असे देखील सांगतात आणि हे आम्हाला तक्रारदार स्वतः सांगतात मुख्याधिकारी हे राष्ट्रवादी पक्षाचे कार्यकर्ते असल्याने त्यांचे अनेक फोटो हे राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांसोबत आमदारांसोबत आहेत निवडणूक झाली की मुख्याधिकारी हे स्वतः विजय झालेल्या उमेदवारांना भेटायला जातात याची पुरावे देखील आहेत आणि अशा पक्षपादी अधिकाऱ्याला पर्यटनासाठी प्रसिद्ध असणाऱ्या शहरांमध्ये विकासाची गंगा वाहत असणाऱ्या शहरांमध्ये ठेवायचं का? या विकासाच्या गंगेत या अधिकाऱ्याने स्वतःचे हात तर धुवून घेतले नाहीत ना? शहराचा निष्काळजी दर्जाचा विकास करता करता स्वतःचा विकास तर केला नाही ना? असा असणारा प्रश्न आता उपस्थित झालेला आहे कायदा काय सांगतो जर का तुम्हाला दारू प्यायची असेल तर तुम्हाला स्वतःकडे देखील लायसन असावे लागते हा कायदा सांगतो परंतु
मुख्यअधिकारी असल्याकारणाने दापकेकर साहेबांकडे दारू पिण्याचे लायसन होतं का? जर गिरीश दापकेकर मुख्याधिकारी पाचगणी यांच्या करिता कायदा वेगळा आहे का? हे एकदा त्यांनी स्पष्ट करावे दापकेकर साहेब हे आमचे प्रतिस्पर्धी नाहीत उलट ते आमचे चांगले मित्र आहेत त्यांच्याविषयी मी अनेक वेळा चांगले लिहिलेल आहे त्यांच्या चांगल्या कामाच मी कौतुक देखील केलेल आहे म्हणून त्यांनी केलेल्या चुकीच्या गोष्टीचं आम्ही समर्थन करू है एकदापी शक्य नाही कायदा सर्वांन करिता आहे त्या कायद्यावरती आमचा विश्वास आहे आणि आम्हाला विश्वास आहे जिल्हाधिकारी आमच्या तक्रारीचे निर्मूलन हे योग्य पद्धतीने करतील असे अनमोल कांबळे यांनी सांगितले,