प्रतिनिधी
अनमोल कांबळे
महाबळेश्वर तालुक्याचे सुपुत्र आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना हाक देणारी महाबळेश्वर तालुक्याची, कथा घोणसपूर मधु मकरंद गडावरील रहिवाशांची वन खात्याच्या परवानगी नसल्याकारणाने रखडलेल्या रस्त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे एकीकडे महाबळेश्वर तालुका हा इको सेन्सिटिव्ह झोन असताना राजरोसपणे वृक्षतोड होते बेभान पने वनपरिक्षेत्रामध्ये व वनसंदृष्य क्षेत्रामध्ये धनदांडगे वनविभागाच्या व शासनाच्या नियमांना आपल्या पायथ्याडाने तुडवत शासन यंत्रणेच्या नियमांना गुलाम बनवतात तर शासकीय अधिकारी या धनदांडग्यांच्या घरी पाणी भरताना दिसते हे चित्र इतकं स्पष्ट असताना देखील दुसरीकडे महाबळेश्वर तालुक्यातील भूमिपुत्रांना 2023 या डिजिटल इंडिया च्या काळामध्ये देखील महाबळेश्वर तालुक्याचे भूमिपुत्र आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री असताना व सातत्याने एकच आमदार तिनटम निवडून देत असताना दवाखान्यात जाण्याकरिता लोकांना आजही डालग्यातून जावे लागत असेल तर म्हणजेच खरा विकास कुणाचा झाला निवडून येणाऱ्या लोकप्रतिनिधींचा की मतदान करणाऱ्या मतदार राजाचा? हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो, घोणसपूर मधु मकरंद गडावरील रहिवाशांचा येणाऱ्या काळामध्ये रस्त्याचा प्रश्न सुटणार का ? हे पाहणं फार गरजेचं आहे,

