महाबळेश्वर प्रतिनिधी
संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या महाबळेश्वर तालुक्यातील गोगवे लागवड वेंगळे ग्रामपंचायत मध्ये आमदार मकरंद आबा पाटील यांच्या गटाला चांगलाच धक्का बसला असल्याकारणाने आत्मचिंतन करण्याची वेळ राष्ट्रवादी काँग्रेसच्या तालुका पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांवरती आल्याचे चित्र दिसत आहे गोगवे गावामध्ये तर चाळीस वर्षानंतर सत्तांतर झाल्याने आमदार घटला सर्वात मोठा धक्का बसल्याचे चित्र दिसत आहे तर लाकवड मध्ये स्वतः राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष बाबुराव सपकाळ यांना देखील आपला गड राखता आला नसून तिथे देखील शिंदे गटाने आपले खाते उघडत थेट धक्कादायक विजय मिळवून संपूर्ण ग्रामपंचायती वरती आपले वर्चस्व ठेवण्यात शिंदे गटाला यश मिळाल्याचे चित्र पाहिला मिळत आहे, व येत्या पंचायत समिती व जिल्हा परिषदेमध्ये सुद्धा हेच चित्र पाहायला मिळणार की काय असा संभ्रम तालुक्यासह जिल्ह्यातील कार्यकर्त्यांच्या मनामध्ये निर्माण झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. हा धक्कादायक पराभव महाबळेश्वर तालुका राष्ट्रवादीच्या किल्ल्याला का बसला याचे आत्मचिंतन करण्याची वेळ आता स्वतः आमदार मकरंद आबा पाटील यांच्या समर्थकांवरती आल्याचे चित्र पाहायला मिळत आहे, तर दुसरीकडे शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांमध्ये नवे पर्व सुरू होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे..

