प्रतिनिधी अनमोल कांबळे
शिक्षण महर्षी डॉ. बापूजी साळुंखे व्याख्यानमाला कार्यक्रमाचे पाचगणी येथील मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये दीपप्रभोजन करून तीन दिवशीय कार्यक्रमाला सुरुवात नागरिकांनी विचारांचा आस्वाद घेण्याचे प्राचार्य सतीश देसाई यांचे आव्हान.
श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, संचलित श्रीमती मीनलबेन महेता कॉलेज महाविद्यालय पाचगणी यांच्या माध्यमातून वार्षिक व्याख्यानमाला वर्ष १४/ वे हा कार्यक्रम पाचगणी व पाचगणीतील नागरिकांच्या वतीने शिक्षण संस्थेच्या माध्यमातून विचारांची देवाणघेवाण करण्याकरिता आयोजित केला जातो व या वेळेच्या १४ व्या वर्षाचे वार्षिक वर्षीय कार्यक्रमाचे उद्घाटन देखील बड्या थाटामाटात मान्यवरांच्या हस्ते करून कार्यक्रमाची सुरुवात झाली आहे, या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी प्रसिद्ध वक्ते मा: संजय कळमकर विषय जगण्याचा आनंदी वाटा यांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रमाचे अध्यक्ष मा: नानासाहेब कासुर्डे मा: प्राचार्य: डॉ सतीश देसाई दादा गोळे रोटरी क्लबचे विचारवंत जयवंत भिलारे विद्यार्थी सेनेच्या माजी अध्यक्ष पूनम गोळे मनोहर देशमुख मा: प्राचार्य: रामचंद्र वर्णे डॉ तुकाराम रांबाडे व इतर मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रमाची सुरुवात झाली असून हा कार्यक्रम इथून पुढे तीन दिवस बड्या थाटामाटात पाचगणी शहरांमध्ये विठ्ठल मंदिर या ठिकाणी सुरू असून या कार्यक्रमामधील प्रबोधनाचे विचार घराघरात पोहोचवण्याकरिता नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आव्हान मीनलबेन मेहता कॉलेजचे मा: प्राचार्य: डॉ: सतीश देसाई यांनी केले आहे.

