पाचगणी पंचक्रोशीतील गाव: कामगार तलाठी दीपक उत्तमराव पाटील यांच्या कार्यकाळाचा निरोप समारंभ अनमोल कांबळे यांच्याकडून पाचगणी येथे उत्साहात साजरा.,
पाचगणी प्रतिनिधी
पाचगणी पंचक्रोशी मध्ये गाव: कामगार तलाठी म्हणून अनेक वर्षांपासून कार्यरत असणारे मा: श्री: दीपक उत्तमराव पाटील यांच्या कामाचा कार्यकाळ संपल्याने व ते वयाच्या 58/ व्या वर्षी सेवानिवृत्त झाल्याने अनमोल कांबळे यांच्या वतीने त्यांचा पाचगणी शहरांमध्ये जाहीर सत्कार करण्यात आला, यावेळी आमोल चव्हाण ऋषभ सपकाळ निलेश राजपुरे वैजनाथ प्रभाळे जय मोरे व इतर शहरातील कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी अनमोल कांबळे म्हणाले कार्यालयामध्ये वाद विवाद हे होतच असतात पाटील तलाठी आणि आमचे वाद हे जग जाहीर आहेत परंतु आमचे वैयक्तिक वाद नसून वैचारिक दृष्टीचे वाद आहेत परंतु त्या वादांना खतपाणी न घालता संविधानाच्या दृष्टिकोनातून संपवण्याचे काम पाटील तलाठी यांनी केले आहे, पाटील तलाठी यांना मंडळ अधिकारी चंद्रकांत पारवे यांचे सहकार्य व मार्गदर्शन असल्याने त्यांच्या मार्गदर्शनाखाली महाबळेश्वर तालुक्यातील पाचगणी पंचक्रोशीतील पर्यावरणाची हत्या होता होता राहिली आहे, इको सेन्सिटिव्ह झोनच्या नियमांचा पालन करण्याचे धोरण हे पाटील तलाठी यांच्या कारकिर्दीमध्ये या पंचक्रोशी मध्ये झाले आहे आपली माती आपला देश आपली माणसं हे धोरण पाटील तलाठी यांनी राबवलेल दिसून येत होत पाटील तलाठी यांच्या जाण्याने पाचगणी पंचक्रोशीतील एक अनमोल हिरा गहाळ झाल्याची जाणीव शहरासह पंचक्रोशीतील प्रत्येक नागरिकाला भासली जाणार आहे, या शहराला मागील कार्य काळामध्ये अधिकारी लाभले परंतु त्या अधिकाऱ्यांनी केवळ अनधिकृत बांधकामांच्या माध्यमातून काळी माया जमवून स्वतःची घरे भरण्याचे काम केले आहे, परंतु समानतेची वागणूक देण्याचं काम करण्यापासून सामान्य माणसाला वगळलेल आहे, हा सन्मान हा पाटील तलाठी यांचा सन्मान नसून त्यांनी केलेल्या कामाची ही पोचपावती आहे, आणि याच पोचपावतीच्या आधारे पाटील तलाठ्यांचे कार्य हे इथून पुढे देखील या कार्यालयामध्ये जिवंत असल्याचे चित्र पाहायला मिळाल्याशिवाय राहणार नाही असे अनमोल कांबळे यांनी सांगितले.,

