प्रतिनिधी पांचगणी
दिनांक 19/12/ 2024 रोजी पाचगणी नगरपालिका हद्दीमध्ये रात्रीच्या अंधारात फायनल प्लॉट नंबर 533/ मध्ये तहसीलदारांनी केलेली कारवाई ही दीपक कांबळे मुळेच अखेर दीपक कांबळे यांनी पोस्ट करत स्वीकारली जबाबदारी डॉक्टर किरण सालपे यांना मानसिक त्रास देणे हाच आमचा मूळ हेतू मुख्याधिकाऱ्यांनीही डॉक्टरांना त्रास न दिल्यास जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रारी करू दीपक कांबळे
पांचगणी येथील फायनल प्लॉट नंबर 533/ मध्ये दिनांक 19/12/2024 रोजी रात्रीच्या अंधारात महाबळेश्वर तहसीलदार यांनी जेसीबी व ट्रॅक्टर सील करत संरक्षण भिंतीचे काम दिवसा सुरू असताना रात्रीच्या अंधारामध्ये कारवाई केली होती व या कारवाई मध्ये आठ दिवस होऊन गेले तरी देखील अनमोल कांबळे यांना जाणीवपूर्वक त्यांचे म्हणणे मांडण्याकरिता अद्याप नोटीस देखील तहसीलदार कार्यालयामार्फत बजावली गेली नाही, व या सर्व कटामागे फार मोठी द्वेषाची शक्ती असून, वैचारिक खच्ची करण्याचा विचार आहे, की काय? कारण कारवाई ही जाणीवपूर्वक कटकारस्थान रचून केलेली कारवाई आहे, ही कारवाई द्वेषा पोटी केलेली कारवाई आहे, असे अनमोल कांबळे वारंवार सांगत होते परंतु दिनांक 26/12/2024 रोजी व्हाट्सअप द्वारे पोस्ट करत या सर्व कटाची जबाबदारी पाचगणीतील रियल इस्टेट एजंट दीपक कांबळे यांनी स्वीकारली आहे, त्यांनी आपल्या पोस्टमध्ये सांगितल आहे की मी पाचगणी नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांना डॉक्टर किरण सालपे यांच्या मिळकतीमध्ये सुरू असलेल्या संरक्षण भिंतीचे काम थांबवण्याकरिता अनेक वेळा मुख्याधिकारी निखिल जाधव यांच्याकडे तक्रारी केल्या होत्या परंतु संरक्षण भिंत त्याठिकाणी पूर्वीपासून असल्याने व संपूर्ण झोन हा डेव्हलपिंग झोन असल्याने नगरपालिका नियमानुसारच सदर मिळकतीमध्ये काम सुरू होते परंतु मुख्याधिकारी आपल्या कामाशी प्रामाणिक असल्याने कुठल्याही प्रकारची चुकीची कारवाई करण्यास तयार नव्हते मात्र दीपक कांबळे यांनी याच गोष्टीचा फायदा घेत आपली राजकीय व आर्थिक शक्ती वापरून महाबळेश्वर तहसीलदार यांना फोन करत कारवाई करायला भाग पाडले आहे, असे दीपक कांबळे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे, इतकच नाही तर थेट डॉक्टर किरण सालपे यांना एक प्रकारे धमकीचा इशारा देत लक्षात ठेवा NA/ प्लॉट असणाऱ्या बांधकाम परवानगी असणाऱ्या व डेव्हलपिंग झोन असणाऱ्या फायनल प्लॉट नंबर 533/ मध्ये संरक्षण भिंतीचे काम न थांबल्यास जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रारी करू असा इशारा जणू काही व्हाट्सअप पोस्टच्या माध्यमातून दीपक कांबळे यांनी दिला आहे, त्यानंतर डॉक्टर किरण सालपे यांनी आमच्याशी बोलताना सांगितले मी एक डॉक्टर आहे लोकांची सेवा हा माझा मुळ धर्म आहे परंतु काही लोक माहिती अधिकाराच्या माध्यमातून माझ्यावरती दबाव आणून माझी मोक्याची जागा कवडीमोल भावात खरेदी करण्यासाठी हा डाव आखत आहेत याचा मला खूप त्रास होत आहे, माझी मिळकत ही पाचगणी नगरपालिका हद्द टी पी 3/ मधील मिळकत आहे माझ्याकडे जिल्हाधिकारी यांची बांधकाम परवानगी आहे, आणि जर का माझ्याकडे बांधकाम परवानगी असतानाही मला अशा मानसिकतेला सामोरे जावे लागत असेल तर जिल्हाधिकारी यांनी माल दिलेली बांधकाम परवानगी तात्काळ रद्द करावी व मला माझ्या जागेमध्ये जिवंत समाधी घेण्यास परवांनगी द्यावी ही जिल्हाधिकारी यांना विनंती करतो असे डॉक्टर सालपे यांनी सांगितले या सर्वांच्या मागचे नक्की गौड बंगाल काय आहे,? पाचगणीतील ती माजी नगरसेविका कोण? जी या सर्व गोष्टी करण्याकरिता पैसे पुरवत आहे, याचा शोध लागणार का? दीपक कांबळे यांच महसूल प्रशासन इतकं का ऐकत बरीशशी माहिती पुढील भागात.

