गली गली मे शोर हे मुख्य अधिकारी चोर हे चले जाव चले जाव गिरीश दापकेकर चले जाव च्या घोषणेने पाचगणी नगरपालिका दणानली



पाचगणी प्रतिनिधी

पाचगणी नगरपालिका कार्यालया समोर दिनांक 3/10/2022 रोजी अनमोल कांबळे यांनी गाढव आंदोलनाचे नियोजन पाचगणी नगर परिषदेचे मुख्याधिकारी गिरीश दापकेकर यांच्या मनमानी कारभारा विरुद्ध व वाढत्या भ्रष्टाचारा विरुद्ध केले होते या आंदोलनामध्ये रिपब्लिकन सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष किरण अडसुळ रिषभ सपकाळ यांचा सक्रिय सहभाग असल्याचे चित्र दिसून आले गदा हे गदा हे मुख्याधिकारी गदा है च्या घोषणेसह चले जाव चले जाव गिरीश दापकेकर चले जा पैसे खाता है पैसे खाता है मुख्याधिकारी गिरीश दापकेकर पैसे खाता है अशा घोषणा देण्यात आल्या या आंदोलनामुळे इथून मागे शांत असणार्या पाचगणी शहरांमध्ये आता प्रशासनाच्या विरुद्ध मनमानी कारभारा विरुद्ध आवाज उठत असल्याचे चित्र दिसून येत आहे आंदोलन झाल्यानंतर निवेदन देत असताना अनमोल कांबळे यांनी सांगितले की मुख्याधिकारी यांचं काम चांगलंच आहे परंतु चांगलं कामाचा आरसा दाखवून त्यामध्ये चाललेला निष्काळजीपणा त्यातून उद्भवत असलेला भ्रष्टाचार हा तात्काळ थांबला पाहिजे पाचगणी शहराचे सौंदर्य असणारे हेरिटेज वास्तु ही जैसे थी तैसी परिस्थितीथीत राहिली पाहिजे मुख्याधिकारी जर का आमच्या तक्रारी सोडवण्यात यशस्वी राहिले तर इथून पुढे तीव्र स्वरूपाच्या आंदोलन हे या नगरपालिकेपुढे केले जाईल असे अनमोल कांबळे यांनी सांगितले मुख्याधिकारी गिरीश दापकेकर यांच्या भोंगळ व भ्रष्टाचारी कारभाराविषयी अनेक तक्रारी उद्भवलेल्या आहेत व या तक्रारी लवकरात लवकर आम्ही पूर्ण ताकतीने मार्गी लावू परंतु मुख्याधिकारी यांचा मनमानी कारभार असाच चालू राहिल्यास संपूर्ण रिपब्लिकन सेनेची ताकद उभी करून मुख्याधिकाऱ्यांचे निलंबन करण्याची मागणी सह्याद्रीचे भूमिपुत्र असणारे व महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री असणारे एकनाथ शिंदे यांच्याकडे रिपब्लिकन सेनेच्या माध्यमातून केली जाईल असे रिपब्लिकन सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष किरण अडसूळ यांनी सांगितले,