पाचगणी प्रतिनिधी…..
महाबळेश्वर तालुक्यातील पाचगणी नगरपरिषदेचे मुख्यधिकारी गिरीष दापकेकर यांच्यावर चार दिवसांपूर्वी पाठीमागून कोणीतरी शाइफेक केली.त्याचा निषेध नगरपरिषद संपूर्ण सातारा जिल्ह्यातील नगर पालिका प्रशासनाने व पाचगणी नागरपालिकेने मात्र ठेकेदाराना आदेश देऊन रोजनदारीवर काम करत असलेल्या लोकांना घेऊन नोंदवला आणि आम्ही ही निषेध व्यक्त केला. हे सगळं घटना घडली त्याच दिवशी झाले.होयलाच पाहिजे शासकीय अधिकारी हे जनतेच्या सेवेसाठी असतात सरकार आपलाच पैसा त्यांच्यावर खर्च करत असते .त्यांचा आदर झालाच पाहिजे.
मात्र मी प्रथम ऐका राजकिय पक्षाचा पुरस्कृत विचारांचा असून नंतर शासकीय सेवेत हे लक्ष असल्याने त्यांनी पाचगणी शहरातील अनेक संघटनाना वेठीस धरले अशी चर्चा पाचगणी शहरात आहे. शाइफेक झालेली व्यक्ती ही प्रशासकीय आहे आणि कदाचित घडलेली घटना ही उदासीन कारभाराच्या विरुद्ध चा उद्रेक असू शकतो? प्रथमदर्शनी तो समाजातील पीडित अथवा मागास घटक नाही. कायदेशीर प्रक्रिया आणि संपूर्ण प्रशासन त्यांच्या सोबत आहे
मग अशा काही संघटना ज्या महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत नाहीत त्या बरखास्त होण्याच्या मार्गावर आहेत त्यांचं समर्थन, जे बांधकाम व्यावसायिक आहेत ऐतिहासिक वास्तू विनापरवाना पडतात नूतनीकरण करतात कोणतीही परवानगी न घेता उत्खनन करून पर्यावरणाचा ऱ्हास करतात डोलेजंग बांधकाम करतात त्यांचं समर्थन त्यांची इच्छा नसताना जबरदस्ती संपर्क साधून त्यांना निवेदन देण्यातस भाग पाडत आहेत मग कधीतरी भविष्यात कार्यकाळ वाढून मिळावा किंवा इतर काही म्हणून त्यांचा वापर करून घेता यावा म्हणून मुख्याधिकारी बेकायदेशीर बाबींना सहकार्य किंवा त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतात का?
शाइफेक, आंदोलने, मोर्चे, उपोषण, संप, हे अधिकार भारतीय राज्यघटनेने नागरिकांना त्यांच्या न्याय हक्कासाठी दिलेले आहेत त्याचा गैर वापर होऊ नये म्हणून कडक कायदेही करण्यात आलेले आहेत आणि पाचगणी शहरातील घटना ही देशातील किंवा राज्यातील पहिलीच घटना घडली आहे का की ज्यामुळे आणीबाणी चा काळ निर्माण झाला आहे म्हणून सर्व यंत्रणा स्वतः न्यायालयाच्या भूमिकेत व्यक्त होऊन कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करत आहे पोलिसांच्या शेजारी उभं राहून जर आंदोलनकर्ते धमकी वजा आदेश पोलीस प्रशासनाला देत व संपूर्ण जिह्यातील प्रशासनावर आपली पकड दाखवत असतील तर गिरीश दापकेकर यांनी पूर्णवेळ राजकिय कामच करावं अशा खाजगीत चर्चांना उधाण आले आहे
आपण पाचगणी नगरपरिषदेचा पदभार स्वीकारल्या पासून किती कामे कायदेशीर केली व किती लोकांना अभय दिले आपल्या विरुद्ध किती तक्रारी नगरविकास विभाग महाराष्ट्र राज्य व सातारा जिल्हाधिकारी कार्यालय न्यायालय इथं सर्व माहिती आहे आणि घडलेल्या घटनेतून मूळ लक्ष विचलित करण्यासाठी आपल्या चुकांवर पांघरूण घालण्यासाठी मात्र एका माजी नगरसेविका व एका राष्ट्रीय पक्षाचा कार्यकर्ता ह्यांना खाजगीतआदेश देऊन आपण उत्तम प्रकारे प्रशासनाची दिशाभूल करत सहानुभूती दाखवून दबाव आणत आहात मीच कसा बरोबर आहे व मला आणखी संधी इथेच राहण्याची मिळावी बऱ्याच तडजोडी पूर्ण होण्याच्या मार्गावर असताना हा अचानक निर्माण झालेला अडथळा दूर करण्यायासाठीची धडपड ही लोकशाहीला घातक आहे ....

