महाबळेश्वर प्रतिनिधी….
ऐतिहासिक,वैचारिक, आध्यत्मिक, वारकरी, शूरवीरांची गाथा जोपासणाऱ्या सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्यात दांडेघर असे गाव महाबळेश्वर तालुक्याचे मुख्य प्रवेशद्वारच स्वयंभू जागृत केदारेश्वर देव साक्षात पांडवकालीन इतिहासची साक्ष देतात संपूर्ण दांडेघर गाव हे केदारेश्वरदेव म्हणून इनाम गाव केदारेश्वर देव आणि वाहिवाटदार वाकडे. देवस्थान जमिनी शासनाने वहिवाटदारांच्या नावे करण्याचा घेतलेला निर्णय हा अतिशय आनंददायी आहे यातून 27 हजार 500 एकर जागेचा प्रश्न मार्गी लागणार आहे. लोकांनची फसवणूक थांबणार आहे आणि देवस्थानच्या मिळकती ह्या विकसित होण्यासही मदत होणार आहे महाबळेश्वर तालुक्यातील मौजे दांडेघर हे संपूर्ण इनाम वर्ग 3 चे गाव वाकडे हे 1860 पासून वाहिवाटदार आहेत. मात्र काही निवडक कुप्रसिद्ध एजंट लोकांनी देवाचं देवस्थान इनामच हटवायचा विडा उचलला आणि बोगस खरेदीखत, साठेखत,सातबारा नोंदी 90 च्या दशकापासून जोरात चालू झाल्या आज अखेर पर्यंत चालू राहिल्या 2015 नंतर तर अशी काही उसळी घेतली की अंडरवर्ल्ड पासून सिनेसृष्टीपर्यंत आणि तिथून पुढे राजकीय नेत्यापर्यंत अनेक लोकांना केदारेश्वर देवस्थानच्या मालकीच्या जमिनी दांडेघर हद्दीतील तळमाळ पर्यंत करोडांच्या भावात विकून फक्त नोटरी डॉक्युमेंट केला ना देवस्थानची परवानगी घेतली ना शासनाला गंभीर्य कळले आणि ग्रामपंचायत दांडेघर ने 8अ चे उतारे जागा मालकांना दिले त्या नोटरी बोगस ते मिळकतीचे ग्रामपंचायत चे उतारे ही बोगसच कारण खरेदी विक्री करणारे ग्रामस्थ अथवा एजंट जागा विकणारे किंबहुना सांभाळणारे गाव वाले मालक होऊ शकत नाहीत कारण वाकडे सन 1860 पासून वहिवाटदार आहेत. वाकडे यांनी गावची पूर्ण किंमत भरली होती.हे महाराष्ट्र शासनाने कोर्टात मान्य केले आहे. सन 1960 पासून दांडेघर या गावाला कुळ कायदा लागत नाही. असा शासन आदेश झाला. त्याचा फेरफार 617असा आहे, बिगर हक्की इस्मानी पुणे मुंबई नाशिक येथील अनेक लोकांना बेकायदेशीर व्यवहार केले ते नोंदी रद्द करण्यात आल्या आहेत.तरीही आजही बोगस साठेखत होतात म्हणजेच देवस्थान शर्तभंग केली जात आहे आणि ग्रामसेवक आजही 8अ चे उतारे ग्रामपंचायत मध्ये 1 तासाच्या आत देतात केवढा हा देवस्थानच्या जमिनीत घोटाळा आर्थिक लोभापोटी केला जातो.कायद्यालाच नाही तर देवस्थान च्या नियम अटींनाही धाब्यावर बसवून थेट कात्रजचा घाट दाखवला जात आहे. स्थानिक प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत भल्या मोठ्या टोलेजंग इमारती विनापरवाना देवस्थानच्या जमिनीमध्ये पर्यावरणदृष्ट्या अतिसंवेदनशील भागात भलेमोठे उत्खनन होऊन उभ्या राहतातच कशा हा संशोधनाचा व शासकीय अधिकारी यांचा उघडनिष्क्रियपणाचा विषय आहे व भविष्यात भूस्खलन होऊन पुणे येथील माळीण गावा सारखी परिस्थिती निर्माण होय नये म्हणून चिंतेचा गंभीर विषय आहे.
यालाच आळा बसावा देवाच्या जागा वाचल्या पाहिजे म्हणून केदारेश्वर देव वाहिवाटदारां श्री सुहास वाकडे यांनी वाई उपविभागीय अधिकारी यांच्या दालनात एक अपील दाखल केले तेथे त्यांचे विधिज्ञ कायद्याचे उत्कृष्ट अभ्यासक गेली 20 वर्षे पुराव्यानिशी बाजू मांडणारे ऍड श्री रविराज जोशी यांनी सर्व पुराव्यानिशी दाखल केलेल्या अपिलावर 20 -7 -2022 रोजी मा.उपविभागीय यांनी आदेश दिले की 9 फेब्रुवारी 2018 च्या शासननिर्णयानुसार तात्काळ सर्व फेरफार रद्द करण्यात यावेत तसेच देवस्थान चे नाव तात्काळ कब्जजेदार सदरी घेऊन सुधारित 7/12 तयार करण्यात यावा त्या आदेशाची अंमलबजावणी साध्य स्थितीत चालू आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आता अगदी अलीकडे काही लोक स्वतःच पाप झाकण्यासाठी वाहिवातदार रक्षणकर्ते यांच्या वरच गाव विकल असा आरोप अपप्रचार करतात,बोगस मोर्चे आंदोलन खोटे शासन दरबारी पत्र व्यवहार ग्रामसभेत खोटे ठराव करतात इतकच काय खोट्या तक्रारी केसेस निवेदने,बदनामी, षडयंत्र, सगळ्या प्रकारचे मार्ग अवलंबविले जातात का कशासाठी कोणाच्या समाधानासाठी क्षणिक समाधानासाठी पैशासाठी देवाचं देवपण पणाला लावलं जातंय अशा समाजकांटकांचा कायमस्वरूपी चाप लावणारा हा शासन निर्णय स्वागतार्ह समाधानकारक आहे अंमलबजावणी तात्काळ होणे अत्यंत आवश्यक आहे….

