पाचगणी प्रतिनिधी….
मौजे दांडेघर ता महाबळेश्वर जि सातारा येथील मौजे दांडेघर हे संपूर्ण गाव इनाम वर्ग 3 चे गाव असून या गावाला सारा माफी नाही.व देवस्थानचे मालक सात-बारा सदरी 247 हेक्टर ची नोंद श्री सुहास वाकडे यांचे नावे आहे. मात्र दांडेघर गावचे जातीयवादी समाजकंटक स्वतःला स्वयंघोषित पुढारी समजणारे यांनी दिनांक 24-9-2022 रोजी सोशल मीडियावर संदेश टाकून दिनांक 25-9-2022 रोजी सकाळी ठीक 9.00.वाजता ग्रामपंचायत कार्यालयात एक मीटिंग आयोजित करण्यात आली आहे असे संदेश पाठवले व त्याच दिवशी पाचगणी पोलीस ठाण्यात 110 ग्रामस्थांनी दांडेघर गाव 4 लोकांनी विकला व त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करा असे निवेदन दिले हे निवेदन तात्काळ सगळीकडे फिरले अतिउत्साही पत्रकारांनी अपुऱ्या माहितीच्या आधारे नेहमीप्रमाणे मीडिया अँप व वर्तमान पत्रात दिमाखात सुहास वाकडे. रविराज जोशी. राहणार -पुणे. अशोक गायकवाड रा. वाई पूनम कांबळे (गोळे) रा.पाचगणी यांनी संपूर्ण दांडेघर गाव विकला अशा बदनामी कारक न केलेल्या घटनेत नाव नोंदविले याची खरी शहानिशा करण्यासाठी आज रोजी पूनम कांबळे (गोळे) महितीअधिकार अधिनियम 2005 नुसार प्रथम शासकीय जबाबदार शासन प्रतिनिधी मा. गावकामगार तलाठी यांच्याकडे माहितीच्या अधिकारात मौज- दांडेघर हे गाव विकल्याचा दस्त अथवा कोणताही सक्षम शासकीय अधिकृत खरेदी- विक्रीसाठी ग्राह्य असणारा पुरावा नोंदणी करिता आपल्याकडे आला आहे का आला असल्यास तो आम्हाला मिळावा असा अर्ज करून माहिती अतितातडी मागविण्यात आली. महितीअधिकारातील नियमानुसारच आणि मा. गावकामगार तलाठी यांनी असा कोणताही संपूर्ण गावातील कोणत्याच क्षेत्रा चा दस्त अथवा पुरावा झालाच नाही त्यामुळे तो उपलब्ध नसल्याचा खुलासा लिखित पत्र देऊन केला आहे.त्यामुळे दांडेघर ग्रामस्थांन चा एवढा मोठा बनाव उघड झाला आहे त्यांच्यावर तोंड लपविण्याची वेळ आली असून सर्व स्तरातून निषेध व्यक्त होत आहे..
पूनम कांबळे(गोळे) यांनी मात्र एक प्रश्न अनुत्तरित राहतो मौजे दांडेघर गावात आजी-माजी सरपंच जावली बँक संचालक. सोसायटी चेरमन. ऐका राजकिय पक्षाचे पदाधिकारी.स्वयंघोषित पुढारी अशी संपूर्ण मंडळी असताना हा गाव विकल्याचा इतका मोठा गंभीर बनाव कोणताही ठोस पुरावा नसताना आणि गाव विकणे ही कल्पना च कुणी करू शकत नाही ही जगाच्या पाठीवरची अशक्य गोष्ट कशाच्या आधारे कोणाच्या सांगण्यावरून आणि का ही गाव विकल्याची अफवा पसरवून हा बनाव करण्यात आला? याचा उद्देश काय असावा दसऱ्याच्या दिवशी लोकांची माथी भडकावून घातपात करणे?रागातून वयक्तिक आमच्यावर हल्ला करणे? दोन समाजात जातीत दूषित वातावरणनिर्मिती करून दंगल मोर्चा आंदोलन घडवून आणणे? कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणे? 2/4 वरील पदाधिकारी संपूर्ण गावात गैरसमज पसरवून स्वतःची दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करताय आणि यांना काळा धंदा करणारे समाजघातक ऐका विशिष्ट राजकिय पक्षाचे लोक रसद पुरवत आहेत फक्त सामाजिक स्वास्थ्य बिघडविणे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करण्यासाठी अशी दाट शक्यता नाकारता येत नाही.अशी शंका उपस्थित केली असून हे पोलिसांसमोर फार मोठ आव्हान आहे व पोलिसांनीअतिशय गंभीर प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन याची सखोल चौकशी करून तात्काळ दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करावी….
अवघ्या 3 दिवसांत अखेर दांडेघर ग्रामस्थांनची लबाडी उघड, गाव विकल्याचा खोटा बनाव.. महिती अधिकारात माहिती उघड…110 ग्रामस्थांनवर तोंड लपविण्याची वेळ सर्व स्तरांतून निषेध….

