पाचगणी प्रतिनिधी
अनमोल कांबळे
मौजे दांडेघर येथील संपूर्ण गावचे मालक श्री सुहास लक्ष्मण वाकडे अशी ज्यांची गावच्या बुक नंबर पाच मध्ये नोंद आहे व हे स्वतः शासकीय कागदोपत्रे 247/ सेक्टर चे मालक आहेत व या निर्णया वरती आता मुंबई उच्च न्यायालयासह उपविभागीय प्रांताधिकारी वाई यांनी देखील शिक्कामोर्तब केल्याची चित्र दिसून येत आहे उपविभागीय प्रांत अधिकारी वाई यांच्या न्यायालयामध्ये जमिनीच्या चालू असणाऱ्या वादामध्ये गावातील गावकऱ्यांनी सुहास वाकडे यांना गावामध्ये येण्यास बंदी घालावी अशी राजकीय पातळीवरती सोयी करून ठेवली होती परंतु सुहास वाकडे यांच्या बाजूने कायदे तज्ञ ॲड. रविराज जोशी बाजू मांडत असताना गावकरी हे देवस्थानाच्या जागेमध्ये बेकायदेशीर हॉटेल व्यवसायाच्या माध्यमातून रेड लाईन्स व्यवसाय करत असल्याचे चित्र समोर येत असून देवस्थान जागेला हा लागणारा कलंक आहे व हे मेहरबान न्यायालयाने मान्य केले असून या गावातील सातबारा वरील असणाऱ्या सर्व वहिवाटदारांची नावे हटवून गावचे मूळ मालक श्री सुहास लक्ष्मण वाकडे याचे नाव सातबार्या वरती दाखल करावे असे आदेश असताना त्या आदेशा वरती गावकऱ्यांचे म्हणणे ऐकून घेण्याकरिता उपविभागीय प्रांत अधिकारी वाई यांनी अनेक वेळा तारखा दिल्या परंतु गावकऱ्यांकडे जागे संदर्भात कुठलाही पुरावा नसल्याने अखेर गावाची हार झाली आणि सुहास वाकडे यांचा ॲड कायदे तज्ञ रविराज जोशी यांच्या माध्यमातून विजयी झाल्याचे चित्र दिसून येत आहे व सहा वर्षांपासून न्यायाच्या प्रतीक्षेत मध्ये असणारे सुहास लक्ष्मण वाकडे यांचा अखेर कायदे तज्ञ रविराज जोशी यांच्या माध्यमातून विजयी झालेला दिसून येत आहे परंतु आता गावकऱ्यांची हार झाल्याने गावकरी सुहास वाकडे यांना स्वतःच्या जागेमध्ये येत असताना रोखण्याची कुठली युक्ती लढवतात आंदोलन करतात? की पुन्हा राजकीय पुढार्यांना हाताशी धरून गावगुंडांचा मोप दाखवून पुन्हा व सुहास वाकडे यांच्यावरती दबाव आणणार का ?.

