मौजे भोसे ता महाबळेश्वर येथील सर्व्हे नंबर 24/5 मध्ये गुन्हा दाखल असताना रात्रीच्या अंधारात चालू असणाऱ्या बेकायदेशीर बांधकामा वरती कारवाई कधी गरिबांवरती कारवाई मात्र धनदांडग्यना मोकळीक का? दिवाळीच्या मुहूर्तावर धनदांडग्यांकडून बोनस गोळा करण्याची युक्ती तर नाही ना? महसूल यंत्रणेच्या कारवाईकडे संशयाचे ग्रहण भूमिपुत्रा वरती अन्याय होऊ देणार नाही.श्री राजेंद्र शेठ राजपुरे
प्रतिनिधी
अनमोल कांबळे
आज दिनांक 2 नोव्हेंबर हा दिवस महाबळेश्वर तालुक्यातील गरीब भूमिपुत्राला हादरवणारा दिवस ठरला आहे आज महाबळेश्वर तालुक्यामध्ये अनाधिकृत बांधकामांवरती हातोडा उचलत महसूल यंत्रणेनेने आपला प्रशासकीय दबदबा लोकांच्या मनामध्ये कायम ठेवण्याचा प्रयत्न केला मात्र या दबदब्याच्या नावाखाली दिवाळीचा धमाका गोळा करण्याची युक्ती अधिकाऱ्यांची आहे की काय ? अशी चर्चा संपूर्ण तालुक्यामध्ये चालू झाल्याचे चित्र पाहायला मिळाले अचानक चालू झालेल्या अनधिकृत बांधकामांच्या कारवाईने स्थानिक भूमिपुत्र चांगलेच हादरून गेले असल्याचे चित्र पाहायला मिळाले मात्र कारवाई केवळ स्थानिक भूमिपुत्रांवरतीच का? असा देखील सर्वसामान्यांमधून आवाज ऐकू येऊ लागला आहे या घटनेची माहिती मिळताच तालुक्याचे नेते मा. श्री राजेंद्र शेठ राजपुरे घटनास्थळी पोहचून कारवाईची माहिती घेतली कारवाई केवळ स्थानिक भूमिपुत्रांवरतीच का ? असा सवाल करताच अधिकाऱ्यांना चांगलाच घाम फुटला तालुक्यातील शेतकऱ्याला भूमिहीन करण्याचं काम करू नका ऐन दिवाळीच्या तोंडा वरती केवळ भूमिपुत्रा वरतीच कारवाई का याचे उत्तर देताना महाबळेश्वरच्या मुख्याधिकाऱ्यांचे चांगलेच तत फफ झाले अधिकारी हा चार दिवसासाठी येतो आणि मनमानी कारभार करतो हा तालुका क्रांतिकारांचा तालुका आहे पुन्हा जर का अधिकाऱ्याने मनमानी कारभार करण्याचे धोरण आखलं तर जशास तसे उत्तर अधिकाऱ्याला दिले जाईल पहिली कारवाई ही बाहेरून आलेल्या धनदांडग्यावरती करा नंतरच भूमिपुत्रांच्या घरांकडे बघा आता केलेली कारवाई ही पुष्कळ झाली असे सांगताच मुख्य अधिकाऱ्यांनी आपला बोधी विस्तारा गुंडाळून पुन्हा नगरपालिकेच्या दिशेने आपली वाटचाल चालू ठेवली असल्याचे दिसून आले राजेंद्र शेठ राजपुरे म्हणाले तालुक्यातील भूमिपुत्रा वरती अन्याय होऊ देणार नाही असे अधिकारी या तालुक्यांमध्ये खूप आले आणि खूप गेले अधिकाऱ्याने कर्तव्याचे पालन केलेच पाहिजे त्याचा आम्ही सन्मानच करतो परंतु अधिकाऱ्याने जाणीवपूर्वक शेतकऱ्यावरती अन्याय करू नये किंवा स्वतःची दिवाळी चांगली करण्याकरिता स्वतःचा मनमानी कारभार करू नये कारवाई करायचीच होती तर धनदांडग्यांवरती का केली नाही ? पुन्हा तालुक्यामध्ये मनमानी कारभार खपवून घेणार नाही राजेंद्र शेठ राजपुरे यांच्या आवाहना नंतर तणाव शांत झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.,

