सन्मान एक पिढी नव्हे तर अनेक पिढ्या घडवणाऱ्या शिक्षकाचा भाऊसाहेब गुरुजींच्या निरोप समारंभा वेळी पंचक्रोशीतील आजी-माजी विद्यार्थी भावुक,



सन्मान एक पिढी नव्हे तर अनेक पिढ्या घडवणाऱ्या शिक्षकाचा भाऊसाहेब गुरुजींच्या निरोप समारंभा वेळी पंचक्रोशीतील आजी-माजी विद्यार्थी भावुक,

प्रतिनिधी
अनमोल कांबळे

सातारा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कासवंड येथील मुख्याध्यापक असणाऱ्या श्री भाऊसाहेब गेनू दानवले यांनी आपल्या आयुष्यातील ३७ वर्ष ७ महिने या आपल्या महत्त्वाच्या क्षणांना सोबत घेऊन एक विद्यार्थी नव्हे तर अनेक विद्यार्थी घडवण्याचे काम केले आज अखेर त्यांचा निरोप समारंभ वयाच्या 58 व्या वर्षी पार पडत असताना आजी-माजी विद्यार्थ्यांच्या डोळ्यातून अश्रू होते समारंभावेळी समोर बसलेले लोक फार भावुक होते एक विद्यार्थी एक कुटुंब घडवतो परंतु एक शिक्षक अनेक पिढ्या घडवतो याचे दर्शन आज दानवले गुरुजी यांच्या सेवानिवृत्त कार्यक्रमा वेळी घडले शाळेमध्ये कार्यरत असताना बालनाट्य स्पर्धा सांस्कृतिक कार्यक्रम क्रीडा स्पर्धा निबंध स्पर्धा हस्तक्षर स्पर्धा या अशा अनेक स्पर्धा शाळेमध्ये राबवून जिल्हास्तरीय पुरस्कार पटकावण्याचे काम भाऊसाहेब दानवले गुरुजींनी केले असल्याने इतकंच नाही तर नवउद्योजकांना मार्गदर्शन करून उद्योग हा प्रगतीचा मार्ग आहे म्हणून उद्योजक हा घरात नाही तर महाबळेश्वर तालुक्यातील प्रत्येक घरात जन्माला आला पाहिजे हा आदर्श मंत्र देण्याचे काम गुरुजींचे चालू असल्याने गुरुजींचा सन्मान हा केवळ सेवानिवृत्त निरोप समारंभ करून होणार नाही तर लवकरच गुरुजींचा जिल्हास्तरीय सन्मान होणार असल्याचेही लोकांनी सांगितले,