भारत देशाचे स्वातंत्र्य सैनिक बी आर ओंबळे यांच्या पाचगणी येथील घरावरती गावगुंडांचा ताबा वंशज मात्र स्वतःच्याच घराच्या प्रतीक्षेत,
पाचगणी प्रतिनिधी
पाचगणी येथील फायनल प्लॉट नंबर 14/ मध्ये अजिज कुरवले व जनुद्दीन पावसकर तसेच भिलारे यांनी ताबा घेतला असल्याचे भारत देशाचे स्वातंत्र्य सैनिक बि आर ओंबळे यांच्या वंशज क्रांती मांढरे यांनी सांगितले, पुढे जाऊन क्रांती मांढरे म्हणाल्या मी बी आर ओंबळे यांची वंशज आहे आम्ही आमचं घर हे काही लोकांना भाड्याने दिले होते मात्र त्या लोकांनी आमच्या घरावरती कब्जा केलेला आहे परंतु धक्कादायक गोष्ट ही आहे की प्रशासन व शासन त्या लोकांना मदत करत आहे आमची इमारत ही पूर्णपणे अतिदृष्टीमुळे कोसळण्याच्या तयारी मध्ये आहे, व त्या संदर्भात पाचगणी नगरपालिकेने आम्हाला पत्र देखील दिलेल आहे परंतु असे असताना कागदोपत्री आमची इमारत धोकादायक आहे आणि नगरपालिकेच्या मुख्याधिकारी यांच्या नजरेमध्ये धोकादायक नाही का ही असणारी सगळ्यात मोठी शोकांतिका आहे, या गावगुंडांचा धबधबा आमच्या घराच्या शेजारी इतक्या मोठ्या प्रमाणात आहे की आम्ही आमच्या घरी गेलो तर हे गाव गुंड टोळके घेऊन आमच्या अंगावरती येतात व शासन प्रशासनाला आम्ही आमच्या दावणीला बांधतो असे आम्हाला सांगतात म्हणून मी एक महिला असून माझी प्रशासनाला एक विनंती आहे की माझं घर हे अति धोकादायक झालेल आहे व त्या अनुषंगाने शासनाने माझ्या घरावरती शासनाच्या नियमानुसार व पाचगणी नगरपालिकेच्या नोटीसीच्या नियमानुसार कारवाई करावी अशी माझी प्रमुख मागणी आहे परंतु पाचगणी नगरपालिका कारवाई करण्यापासून टाळाटाळ करत आहे हे जिल्हाधिकारी यांनी लक्षामध्ये घ्यावे व स्वातंत्र्यसैनिकाच्या लेकीला न्याय द्यावा व आमचे घर हे फार जुने शंभर वर्षांपूर्वीचे झाले असून ते शासनाच्या पत्राच्या नियमानुसार पाचगणी नगरपालिकेने डिमोनिश करावे व शासनाच्या नियमानुसार पाचगणी नगरपालिकेने बजवलेल्या नोटीसेनुसार असे न झाल्यास मला जिल्हाधिकारी सातारा यांच्या कार्यालयाच्या बाहेर मरेपर्यंत अमरण उपोषण हे करावे लागेल माझी समस्त जनास एक विनंती आहे की या देशांमध्ये स्वातंत्र्यसैनिकांच्या लेकीला जर का न्याय मिळत नसेल आणि गावगुंडांना प्रोत्साहन मिळत असेल तर आम्ही न्यायासाठी कुठे जावे हा विचार इथल्या प्रस्थापित यंत्रणेने इथल्या लोकतंत्र मानणाऱ्या लोकांनी करावा आणि मला न्याय द्यावा अन्यथा येता आठ दिवसानंतर मला मरेपर्यंत उपोषण केल्याशिवाय पर्याय नाही हे जिल्हाधिकारी यांनी लक्षात घ्यावे माझी जिल्हाधिकाऱ्यांना एकच विनंती आहे की पाचगणी नगरपालिकेने आम्हाला बजावलेल्या नोटीसीनुसार पाचगणी नगरपालिकेने त्वरित कारवाई करावी ही माझी पाचगणी नगरपालिकेला कळकळीची विनंती आहे नगरपालिका कारवाई करण्यास गावगुंडांच्या दहशतीपोटी टाळाटाळ करत आहे कारवाई न झाल्यास स्वातंत्र्य सैनिकाच्या लेकीला जिल्हा अधिकाऱ्यांच्या दालनामध्ये प्राण सोडल्याशिवाय पर्याय नाही असे बी आर ओंबळे भारत देशाचे स्वातंत्र्य सैनिक यांचे असणारे वंशज क्रांती मांढरे यांनी सांगितले जिल्हाधिकारी या गोष्टीवरती कारवाई करणार का? पाचगणी नगरपालिका नोटिसीच्या नियमानुसार कारवाई करणार का? हे बघणं गांभीर्याचे ठरणार आहे.,

