मिळालेल्या माहितीनुसार दिं 6/7/8/ रोजी शासन प्रशासन महाबळेश्वर तालुक्याचे अतिक्रमण काढण्याच्या तयारीत पहिली कारवाई श्रीमंतांवरती की गरिबांन वरती याकडे तालुक्याचे लक्ष,
प्रतिनिधी
अनमोल कांबळे
इको सेन्सिटिव्ह झोन म्हणून घोषित असणारा महाबळेश्वर तालुका नेहमीच आराधिकृत बांधकामांच्या उद्देशाने चर्चेत राहिलेला असून बाहेरून येणाऱ्या धनिकांनी आपल्या काळ्या मायेची तिजोरी म्हणून महाबळेश्वरला पसंती दिलेली असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे कमी भावात शेतकऱ्यांकडून जमिनी खरेदी करायच्या आणि प्रचंड मोठ्या प्रमाणात आलिशान अनाधिकृत बंगले स्थानिक धनिकांना लँड माफियांना हाताशी धरून उभे करायचे आणि महाबळेश्वर तालुक्याचे असणारे सौंदर्य हे उध्वस्त करून टाकायचं मात्र प्रशासन नेहमीच दुजाभाव करत आल्याचे चित्र देखील पाहायला मिळत आहे आनाधिकृत बांधकामांचा विषय आला की केवळ कारवाई ही मात्र स्थानिक भूमिपुत्रांच्या छोट्या छोट्या हॉटेलांन वरती करायची आणि मोठ्या माशांना अभय द्यायचं असा दुजाभाव करत असल्याचे चित्र पाहायला आज पर्यंत मिळालेल आहे मात्र मिळालेल्या माहितीनुसार दिं 6/7/8/ रोजी अचानक महाबळेश्वर तालुक्यामध्ये आनाधिकृत बांधकामांवरती होणारी कारवाई नक्की कोणावरती होणार ? हा प्रश्न अद्याप गुपितच असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे, मोठ्या धानिकांन वरती कारवाई होणार की पुन्हा एकदा त्यांना अभय मिळणार हे बघणं आश्चर्याचे ठरणार आहे,

