प्रतिनिधी अनमोल कांबळे
महाराष्ट्र शासन औद्योगिक प्रशिक्षण पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना महाबळेश्वर तालुक्याच्या वतीने अर्जुन जेधे यांच्या हस्ते प्रमाणपत्र वाटप
महाराष्ट्र औद्योगिक प्रशिक्षण संस्था महाबळेश्वर येथे मा: पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे प्रमाणपत्र वाटपाचा देशभर आज रोजी कार्यक्रम पार पडला कार्यक्रम पार पडत असताना समाजातील होतकरू कार्यपद्धत बाळगत सामाजिकतेचा वारसा जपणाऱ्या मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र वाटप करण्यात आले यावेळी महाबळेश्वर तालुक्याच्या वतीने श्री अर्जुन मोहन जेधे यांच्या हस्ते प्रशिक्षण पूर्ण झालेल्या मुलांना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले प्रमाणपत्र वाटप झाल्यानंतर अर्जुन जेधे यांनी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

