गट्रे ही नाहीत दवाखान्याला डॉक्टरही नाही सिद्धार्थनगर ची दैनंदिन अवस्था माजी नगरसेवकांचा भोंगळ कारभार चव्हाट्यावरती आता तरी प्रशासनाने कामाला लागावे अर्जुन जेधे



प्रतिनिधी पांचगणी

गट्रे ही नाहीत दवाखान्याला डॉक्टरही नाही सिद्धार्थनगर ची दैनंदिन अवस्था माजी नगरसेवकांचा भोंगळ कारभार चव्हाट्यावरती आता तरी प्रशासनाने कामाला लागावे अर्जुन जेधे

पाचगणी येथील सिद्धार्थ नगर मध्ये प्रशासनाच्या योजनेमध्ये असणारा बाळासाहेब ठाकरे दवाखान्याचे उद्घाटन होत असताना ते उद्घाटन मोठ्या थाटामाटात पार पडले होते मात्र उद्घाटन झालं प्रशासनाचा आलेला लाखो रुपयाचा फंड वापरला गेला बॅनरबाजी केली गेली परंतु आजची परिस्थिती अशी झाली आहे की सिद्धार्थ नगर मध्ये उभारण्यात आलेल्या हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे दवाखान्यामध्ये डॉक्टरच गैरहजर आहे असा खळबळ जनक दावा सिद्धार्थनगर येथील युवा नेतृत्व सामाजिक कार्यकर्ते अर्जुन जेधे यांनी केला आहे, अर्जुन जेधे म्हणाले मी सिद्धार्थ नगर येथील सामाजिक कार्यामध्ये गेल्या पंधरा वर्षापासून कार्यरत आहे, या सिद्धार्थ नगरच्या रहिवाशांनी सर्वसामान्य लोकांना नगरसेवक बनवून पाचगणी नगरपालिकेमध्ये आपल्या नेतृत्वा सह आपला विकास करण्यासाठी पाठवलं होत परंतु त्या लोकांना लोकांचे नेतृत्वच आणि वॉर्डचा विकास कसा करायचा हेच कळालं नाही त्यामुळे सिद्धार्थनगरची आज ही दैनंदिन अवस्था झाली आहे, सिद्धार्थ नगर येथील ड्रेनिस चे काम अपुरे आहे गटराचे काम अपुरे आहे, प्रशासकीय कारभार गेल्या चार वर्षापासून मुख्याधिकारी यांच्या रूपाने पाचगणी नगर परिषदेमध्ये सुरू आहे मात्र माजी नगरसेवकांच्या ढवळाढवळीमुळे सिद्धार्थ नगरचा कुठलाही विकास होत नसल्याचे अर्जुन जेधे यांनी सांगितले अर्जुन जेथे म्हणाले माजी नगरसेवक अधिकाऱ्यांची दिशाभूल करतात अधिकाऱ्यांना खोटे सांगतात की मी या वॉर्ड चा नगरसेवक आहे व माझा या ठिकाणी दबदबा आहे असे सांगून अधिकाऱ्यांची दिशाभूल करत आजपर्यंत सिद्धार्थ नगरला दिशा न देता सिद्धार्थ नगरची दशा केल्याचे चित्र आम्हाला पाहायला मिळाले आहे, इथून पुढे अधिकाऱ्यांनी या माजी नगरसेवकांच्या भूलथापांना बळी पडू नये सिद्धार्थ नगर चा विकास युवकांच्या हाताला रोजगार व रहिवाशान वरती होणारा अन्याय याला सामोरे जाण्याकरिता सिद्धार्थ नगर मधील रहिवासी व मंडळाचे सर्व कार्यकर्ते सक्षम आहेत याची दक्षता प्रशासनाने घेऊन सिद्धार्थ नगर मध्ये माजी नगरसेवकांमुळे विकासाच्या नावाखाली झालेली दुर्दशा लवकरात लवकर मुख्याधिकारी यांनी दूर करून योग्य सोयी सुविधा सिद्धार्थ नगर येथील रहिवाशांना द्याव्यात असे सिद्धार्थनगर येथील रहिवासी सामाजिक कार्यकर्ते अर्जुन जेधे यांनी पाचगणी नगरपरिषद मध्ये दिलेल्या निवेदनामध्ये म्हंटले आहे असे अर्जुन जेधे यांनी सांगितले.