प्रतिनिधी पांचगणी
मला संधी मिळाल्यास पाचगणी शहराला उज्वल दिशा दाखवण्याचे विजन माझ्याकडे आहे अनमोल कांबळे.
पाचगणी नगरपालिका येऊन ठेपलेल्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये अध्यक्षपदा करिता एस सी आरक्षण आरक्षित असल्याने पाचगणी शहराच्या जनतेने मला संधी दिल्यास पाचगणी शहराला उज्वल करण्याचे विजन माझ्याकडे असून पाचगणी शहरातील प्रत्येक नागरिकाला व प्रत्येक घटकाला शासन दरबारी न्याय देण्याचा प्रयत्न मी करू शकतो असे अनमोल कांबळे यांनी सांगितले अनमोल कांबळे म्हणाले मी गेल्या पंधरा वर्षापासून चळवळीमध्ये कार्यरत आहे आंदोलने मोर्चे न्यायासाठी जगडण्याची जाणीव मला आहे प्रशासनातील काही अधिकारी आपल्याला मिळालेल्या अधिकारांचा कशाप्रकारे दूर उपयोग करत सर्वसामान्यांवरती अन्याय करतात याची जाणीव मला आहे, व प्रशासनातील अधिकाऱ्यांना त्याची परत जाणीव कशी करून द्यायची याची कायदेशीर माहिती देखील माझ्याकडे आहे, कारण गुलामाला गुलामीची जाणीव करून द्या तो बंड केल्याशिवाय राहणार नाही हा अधिकार आमचा आहे आणि तो अधिकार आम्हाला संविधानाने दिलेला आहे याची माहिती माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आहे, पाचगणी शहराच्या प्रत्येक नागरिकाला कुठल्याही प्रकारची अडचण आल्यास त्याने माझ्याशी संपर्क साधावा त्या अडचणीचे निर्मूलन करण्याची क्षमता माझ्याकडे आहे, अनेकांना कायदेशीर सल्ला देत आंदोलने मोर्चे करत न्याय देण्याचा प्रयत्न मी केलेला आहे मी एक विद्रोही कार्यकर्ता आहे आणि हे पाचगणी शहरातील जनतेला माहित आहे मी चोराला साहेब बोलणारा कार्यकर्ता नाही तर चोराला चोर बोलणारा कार्यकर्ता आहे मग तो कितीही मोठा असो आणि त्याचे परिणाम काहीही असो कारण परिणामांची पर्वा करून गुलामी सहन करणारा अनमोल कांबळे नाही तर परिणामांना उत्तर देत हुकूमशाहीला आणि गुलामगिरीला दोन हात करून गुलामांना गुलामीची जागा दाखवून देणारा अनमोल कांबळे आहे, आणि हे शहरातील प्रत्येक सुशिक्षित मतदाराला माहित आहे आणि म्हणून शहरातील प्रत्येक सुशिक्षित मतदार हा माझ्यासोबत आहे मी सुद्धा एक व्यापारी आहे लहानपणापासून पर्यटकांची सेवा करण्याचे काम मी केलेल आहे आणि म्हणून छोट्यातला छोट्या व्यापारी हा माझ्यासोबत आहे याचा मला अभिमान आहे, म्हणून या निवडणुकीमध्ये मला पाचगणी शहराची जनता नक्की संधी देईल हा आत्मविश्वास मला आहे आणि हा होणारा माझा विजय हा माझा नसेल तर हा विजय पाचगणी शहरातील प्रत्येक नागरिकाचा मतदाराचा विजय असेल असे अनमोल कांबळे यांनी सांगितले.

