प्रतिनिधी अनमोल कांबळे
भाग: दुसरा: पाचगणी शहरात आदर्श गल्लीसह देशी दारू दुकानाच्या पाठीमागे खुलेआम चक्री जुगार मटका चालवणाऱ्या पाटील खरात व पठाण माफियाला पाचगणी पोलिसांचा आळा काही बसेना कष्टकऱ्यांची लूट मात्र सुरूच पोलीस अधीक्षकांनी स्वतः या प्रकरणात लक्ष घालन्याची पाचगणी करांची मागणी
पाचगणी शहरामध्ये खुलेआम चक्री जुगार मटका व्यवसाय आदर्श गल्ली सह देशी दारूच्या दुकानाच्या पाठीमागे मुख्य बाजारपेठेमध्ये सुरू झाला असून या संदर्भात लढा महाराष्ट्र ने आपल्या लेखणीतून वेळोवेळी आवाज उठवलेला आहे, परंतु पोलिसांचे संरक्षण घेऊन की काय? साताऱ्यातील जुगार चक्री माफिया आपले कष्टकऱ्यांना लुटमारीचे धोरण चक्क पाचगणी पोलिसांना देखील घाबरून सोडत नसल्याने व खुलेआम चक्री मटका जुगार व्यवसाय पाचगणी शहराच्या मुख्य बाजारपेठेमध्ये जोरात सुरू असल्याने पाचगणी करांमधून तीव्र संतापाच्या भावनेची लाट असल्याचे दिसून आले आहे, इतर दिवशी गाडीचे लायसन नसल्यास दंड करणारे पाचगणी पोलीस मात्र यावेळेस सातारच्या जुगार चक्री मटका माफियाला पाचगणी शहरामध्ये अभय देत असल्याचे चित्र दिसून आले आहे, लढा महाराष्ट्रने या विरोधात वेळोवेळी लोकांचा आवाज आपल्या लेखणीतून उठवलेला आहे, तरी देखील कष्टकऱ्यांना लुबाडणारे धोरण हे सातारच्या पाटील पठाण व खरात जुगार चक्री मटका माफियांनी सुरूच ठेवले असल्याने यांला अभय तरी कुठल्या सरकारचे आहे ? असा असणारा प्रश्न उपस्थित झाला असून स्थानिकांच्या संतापाच्या तीव्र लाटीची भावना सातारा पोलीस अधीक्षक समीर शेख समजून घेणार का? पाचगणी येथील चक्री मटका जुगार बंद होणार का? की पुन्हा एकदा पाचगणी शहरात आंदोलने व मोर्चे या जुगार चक्री मटका वाल्यांच्या विरोधात काढावी लागणार? हे बघने गांभीर्याचे ठरणार आहे, पोलीस अधीक्षकांनी स्वतः या प्रकरणांमध्ये लक्ष घालून तात्काळ सातारच्या चक्री मटका जुगार माफीयांचे पाचगणी पर्यंतचे धागेदोरे कापून त्याच्या मुस्क्या वळण्याची मागणी आता पाचगणीतील स्थानिक नागरिकांकडून होत असल्याचे दिसून आले आहे, पहा पुढील भागात पाचगणीतील सर्व चक्री मटका संदर्भातील व्हिडिओ.

