प्रतिनिधी अनमोल कांबळे
पाचगणी अंजुमन हायस्कूल परिसरामध्ये सर्वे नंबर ११/१२/ मध्ये धनदांडग्यांकडून जमिनीच्या पोटात सुरुंग दिवसाढवळ्या बोर मारण्याचे काम सुरूच महाबळेश्वर तहसील प्रशासन सोमवारी काय कारवाई करणार ? याकडे पंचक्रोशी चे लक्ष..
महाबळेश्वर तालुका हा पर्यावरण पूरक इकोसेन्सिटिव्ह झोन असून अतिशय संवेदनशील तालुका मानला जातो परंतु या तालुक्यामध्ये धनदांडग्या कडून नियमावलीचे पालन प्रशासनाती काही अधिकाऱ्यांना हाताशी धरून अजिबात केले जात नाही हे वारंवार दिसून आले आहे, व यालाच प्रत्युत्तर म्हणून दिनांक 8/2/2025 रोजी दिवसाढवळ्या अंजुमन हायस्कूल शेजारी असणाऱ्या सर्वे नंबर 11/12 मध्ये धनदांडग्यांकडून दिवसाढवळ्या बोर मारण्याचे काम सुरू होते मात्र प्रशासनातील तलाठी सर्कल व इतर प्रशासनातील एकही अधिकारी इकडे फिरकला सुद्धा नसल्याने दिसून आले असल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे अखेर सर्वे नंबर 11/ 12 मध्ये बोर मारत असताना प्रशासन झोपले होते का? की दोन दिवसांपूर्वी एका पोर्टलने तलाठी कार्यालय पाचगणी या ठिकाणी मंडल अधिकारी व तलाठी यांचे मांडलेले वास्तव हेच खरे होते का? असा असणारा प्रश्न उपस्थित झाला असल्याने सोमवारी प्रशासन अंजुमन हायस्कूल शेजारील सर्वे नंबर 11/12 मध्ये बोर मारुन जमिनीच्या काळजाला जखमा करणाऱ्या धन दांडग्यांवरती कारवाई करणार का? की स्थानिकांना एक न्याय आणि बाहेरून आलेल्यांना एक न्याय देणार हे बघणे गांभीर्याचे ठरणार आहे.

