सातारा प्रतिनिधी
महाराष्ट्रभर संजय भैय्या सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र रिपब्लिकन पक्ष हा वाढत असल्याने आता बहुजनांना गुलामीची नाहीतर स्वाभिमानाची गरज आहे असे म्हणत महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे संस्थापक अध्यक्ष संजय भैय्या सोनवणे यांनी आपला क्रांतीचा लढा हा बहुजनांच्या न्याय हक्कासाठी खांद्यावरती घेतलेला दिसून येत आहे व हे वादळ महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात वाऱ्यासारखे वात असल्याचेही चित्र पाहायला मिळत आहे याच प्रतीक म्हणून काल दिनांक 20 मार्च 2024 रोजी पक्षाचे संस्थापक अध्यक्ष संजय भैय्या सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली अनमोल कांबळे सह इतर कार्यकर्त्यांनी प्रवेश केला संजय भैय्या सोनवणे म्हणाले स्वाभिमान हा टिकला पाहिजे आम्ही समाजासाठी आहो रात्र झटणारे कार्यकर्ते आहोत व परिणामांची आणि पराभवाची परवा करणारे कार्यकर्ते आम्ही नाही आमचा लढा हा इथल्या वंचित पिढीत सोशीतांसाठी आहे, हा लढा आम्ही असाच पुढे घेऊन जाणार आहोत घर तिथे कार्यकर्ता ही मोहीम आम्ही राबवलेली आहे आज कार्यकर्त्यांनी या क्रांतिकारक दिना दिवशी क्रांतिकारक सातारा जिल्ह्यामध्ये पक्षात प्रवेश केलेला आहे आम्ही कार्यकर्त्यांना शुभेच्छा देतो व एकच सांगतो की नेहमी समाजासाठी अहोरात्र झटत रहा हित असणाऱ्या वंचितांना सोशीतांना नेहमी न्याय देण्याचा प्रयत्न करा येत्या निवडणुकीमध्ये आपली भूमिका काय असणार आहे असा प्रश्न विचारल्यानंतर संजय भैया सोनवणे म्हणाले देशाच्या विकासाच्या बाजूने आम्ही नेहमी उभे राहत आलो आहे व इथून पुढेही राहू आमची भूमिका अद्याप आम्ही स्पष्ट केलेली नाही परंतु पक्षाची भूमिका ही लवकरच आम्ही स्पष्ट करू असे संजय भैया सोनवणे यांनी सांगितले व कार्यकर्त्यांना शुभेच्छा देत लवकरच या कार्यकर्त्यांवरती मोठी जबाबदारी या जिल्ह्यामध्ये पक्ष देणार आहे असेही सूचक वक्तव्य करत महाडच्या दिशेने मार्गस्थ झाले.,

