पाचगणी प्रतिनिधी ….
दिनांक 9-11-2022..
पाचगणी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांचेवर शाइफेक प्रकरणी अनमोल कांबळे यांना अखेर जिल्हा सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. माझ्याबद्दल लोकांनी नाही तर काही ठराविक लोकांना एकत्र करून मला बदनाम करण्याचं षडयंत्र केलं मी फार मोठा 40/45 वयाचा आणि मी फार मोठा कुणीतरी नेता असल्यासारखे अथवा राजकिय व्यक्ती असल्यासारखे माझ्याबद्दल चित्र निर्माण करण्यात आले जणू काही माझं तिकीट कापलं जाईल किंवा माझं मंत्रिपद धोक्यात येईल अथवा माझं राजकिय पद प्रतिष्ठा पणाला लागली आहे इथपर्यंत मला बदनाम खच्चीकरण करण्याचे प्रयत्न झाले पण मी सातारा जिल्ह्यातील क्रांतिकारकांच्या जिल्ह्यात जन्माला आलो आहे. भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा अनुयायी आहे भारतीय संविधान आणि कायद्याप्रती माझी निष्ठा आणि श्रद्धा आहे. तुमच्या सगळ्यांचा मी आभारी आहे आपल्याच वैऱ्याच वैर हे मनावर घ्यायच नसत तुमच्या मुळे मला एकांत मिळाला मी खूप काही शिकलो पाहिलं आयुष्यात चढ- उतार आलेच पाहिजेत आरोप -प्रत्यारोप झालेच पाहिजेत यातूनच माणूस घडतो. लोकांना साठी काम करण्याची नवीन ऊर्जा मिळते आणि ती येणाऱ्या काळात तुम्हाला दिसेलच तुमचे माझ्याबद्दल असणारे प्रेम आशीर्वाद सहकार्य आणि खंबीर साथ अशीच राहु दया मी कायम तुमचा ऋणी राहीन अशी प्रतिक्रिया अनमोल कांबळे यांनी लढा महाराष्ट्राचा आमच्याकडे दिली आहे

