येत्या २४ व २७ तारखेला AN हॉलिडे रिसॉर्ट पाचगणी व्यवसायिकाच्या विरोधात पाचगणी नगरपालिका काय म्हणणे मांडणार? याकडे पाचगणी करांचे लक्ष नागरिकांसह पर्यटकांना वाहतुकीचा नाहक त्रास रोड रुंदीकरणाचा निधी मंजूर मात्र कामाची प्रतीक्षा कायम



येत्या २४ व २७ तारखेला AN हॉलिडे रिसॉर्ट पाचगणी व्यवसायिकाच्या विरोधात पाचगणी नगरपालिका काय म्हणणे मांडणार? याकडे पाचगणी करांचे लक्ष नागरिकांसह पर्यटकांना वाहतुकीचा नाहक त्रास रोड रुंदीकरणाचा निधी मंजूर मात्र कामाची प्रतीक्षा कायम

पाचगणी प्रतिनिधी

पाचगणी महाबळेश्वर फिरायला येणाऱ्या पर्यटकांना नेहमीच वाहतुकीच्या समस्यांना सामोरे जावे लागते आणि महाबळेश्वर कडे जाणारा मुख्य रस्ता व पाचगणी कडे येणारा मुख्य रस्त्यावरती वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत असल्याने स्थानिकांसह पर्यटकांना याचा सामना करावा लागत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे याच दृष्टिकोनातून प्रादेशिक पर्यटन विभागामार्फत रोड रुंदीकरणाचा निधी मंजूर झाला असून प्रत्यक्षात रोड रुंदीकरण कधी होणार? याकडे संपूर्ण पाचगणी शहराच्या नागरिकांसह संपूर्ण राज्याच्या पर्यटकांचे लक्ष लागून राहिले असल्याचे दिसून येत आहे, पाचगणी येथील संबंधित AN हॉलिडे रिसॉर्ट चालक याने रोड रुंदीकरणाच्या विरोधात मेहरबान न्यायालयाचे दरवाजे ठोठावले असल्याने मै खडा तो सरकार से बडा म्हणत थेट शासनालाच न्यायालयामध्ये ओढून नेण्याचे धाडस दाखवले असल्याने स्थानिक भूमिपुत्रांना वाहतुकीच्या समस्यांना तोंड द्यावे लागत असल्याचे चित्र दिसून येत आहे, सदरचे AN हॉलिडे रिसॉर्ट यांनी शासनाच्या बांधकाम परवानगीचा नियमांचा भंग केला असल्याचे ही दिसून येत आहे, सामान्य माणसने घर बांधायचं म्हटलं तर बांधकाम परवानगीच्या नियमानुसारच बांधावे लागते मात्र या AN हॉलिडे रिसॉर्ट धनदांडग्यांनी बांधकाम परवानगीच्या नियमांच्या चिंध्या करत मनमानी कारभाराने नियमाच्या बाहेर जाऊन हॉटेल उभारून पाचगणी नगरपालिका हद्दीतील वाहतुकीच्या रोडलाच चॅलेंज केले असल्याचे दिसून येत आहे, आणि म्हणून पाचगणी नगरपालिका मेहरबान न्यायालयामध्ये आपले मत मांडण्याकरिता कमी पडत असल्याचीही चर्चा संपूर्ण शहरांमध्ये चालू आहे, त्याच दृष्टिकोनातून येत्या २४ व २७ तारखेला AN हॉलिडे रिसॉर्ट व्यवसायिकाची तारीख असल्याने पाचगणी नगरपालिका यावेळेस आपली बाजू भक्कमपणे मांडणार का? स्थानिकांना रोड उपलब्ध करून देणार का? की पुन्हा एकदा धनदांडग्यांसमोर झुकली जाणार है बघणे गांभीर्याचे ठरणार आहे,