पाचगणी येथील अँबेसिडर हॉटेलचा बेकायदेशीर जबरदस्ती ताबा घेणारे सर्व ट्रस्टी बोगस उच्च न्यायालयामध्ये पिटीशन दाखल तर क्रिमिनल पिटीशन महाबळेश्वर न्यायालयामध्ये दाखल डॉक्टर अन्वर हुसेन
पाचगणी प्रतिनिधी
अनमोल कांबळे
देशभरात पर्यटनासाठी प्रसिद्ध असणाऱ्या पाचगणी महाबळेश्वर या थंड हवेच्या ठिकाणी जागेंचे व घरांचे दर हे गगनाला भिडले असतानाच पाचगणी मुख्य बाजारपेठेतील असणारी अब्दुल्ला अब्दुल लतीफ आलोतमान वफ्क बोर्डाची असणारी मिळकत ही संपूर्ण समाजाची मिळकत असून 1959 साली खरेदी केली असून या जागेतून मिळणारे उत्पन्न हे गोरगरीब समाजातील घटकांसाठी असल्याचे डॉक्टर अन्वर हुसेन यांनी सांगितले परंतु काही दिवसांपूर्वी बोगस ट्रस्टी गावगुंड हे त्या ठिकाणी आले आणि त्यांनी दादागिरीच्या व गावगुंडांच्या जोरावरती मिळकतीचा ताबा मिळवला असल्याचे दिसुन येत आहे व गोरगरीब समाजाच्या हक्काचा ताबा हा हिसकावून घेऊन आपल्या वरदहस्त असणाऱ्या बाहेरून येणाऱ्या काही धनदांडग्यांच्या हवाली ही मिळकत करण्याचे धोरण या समाजातील काही गाव गुंडांनी आखले असल्याचे दिसून येत आहे व याविषयी मुंबई उच्च न्यायालयामध्ये विविध पिटीशन चालू असून या गावगुंडांविषयी क्रिमिनल पिटीशन है देखील माननीय महाबळेश्वर न्यायालयामध्ये दाखल केले असल्याचे अन्वर हुसेन यांनी सांगितले पुढे जाऊन अन्वर हुसेन म्हणाले की काही दिवसापूर्वी माझ्या व माझ्या कुटुंबा वरती कोयता घेऊन जीवघेणा हल्ला झाला होता व त्यावेळेस माझ्या घरातून काही महत्त्वाची कागदपत्रे देखील पळवली गेली होती त्याच कागदपत्रांचा आधार घेऊन ट्रस्टचे बोगस पेपर बनवले असल्याचे अन्वर हुसेन यांनी सांगितले व या सर्व कटामध्ये काही वकील देखील सामील असून भविष्यात माझ्या जीवाला मी समाजासाठी काम करत असल्याने धोका निर्माण झाला असल्याचे अन्वर हुसेन यांनी सांगितले मी ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणी संपूर्ण सोसायटीचा असणारा सीसीटीव्ही चा कंट्रोल हा देखील अँबेसिडर हॉटेल या मिळकतीमध्ये ताबा घेणाऱ्या समाजातील काही घटक गाव गुंडांकडे असल्याचेही अन्वर हुसेन यांनी सांगितले व पुढे जाऊन असे म्हणाले की या माझ्या संपूर्ण विषयाची व तक्रारींचे पडताळणी करून मला महाराष्ट्र पोलीस सहकार्य करून लवकरात लवकर प्रोटेक्शन देतील व माझ्या तक्रारींची योग्य दखल घेऊन व माझे संपूर्ण पिटीशन वाचून मेहरबान न्यायालय मला या पिटीशन वरती सामाजिक हितासाठी समाजाच्या भल्यासाठी लवकरच न्याय देईल असे डॉक्टर अन्वर हुसेन यांनी सांगितले.,

