ऑल इंडिया पॅंथर सेनेचे जिल्हाध्यक्ष आदित्य गायकवाड यांच्याकडून सातारा जिल्ह्यातील पहिली पदनियुक्त्या यादी जाहीर
सातारा प्रतिनिधी
ऑल इंडिया पॅंथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार यांच्या नेतृत्वाखाली सातारा जिल्हाध्यक्ष आदित्य गायकवाड यांच्याकडून सातारा जिल्ह्यातील पहिली पदनियुक्त्या यादी जाहीर झाली आहे या यादीनुसार सातारा जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मण पोळ तर सातारा जिल्हा महासचिव आशिष मोरे जिल्हा सरचिटणीस सिद्धार्थ गायकवाड सातारा शहर युवक अध्यक्ष सुशांत वायदंडे तसेच सातारा शहर कार्याध्यक्ष प्रदीप कांबळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे, या नियुक्तीमुळे संघटनेला फायदा होणार असल्याचे जिल्हाध्यक्ष आदित्य गायकवाड यांनी सांगितले आहे, नवनवीन कार्यकर्त्यांना चालना देणे हा संघटनेचा प्रमुख हेतू असून नवनवीन कार्यकर्ते या जिल्ह्यांमध्ये तयार झाले पाहिजेत हे आमचं धोरण आहे, अन्याय अत्याचाराला वाचा फोडली पाहिजे तुम्ही बोलला पाहिजे तुम्ही तयार झाला पाहिजे आणि म्हणून हा आमचा एक नवीन कार्यकर्त्यांना धीर देण्याचा प्रयत्न आहे व आम्हाला विश्वास आहे, कार्यकर्ते त्या प्रयत्नांना कधीही तडा जाऊ देणार नाहीत, व संघटना वाढीसाठी अहोरात्र प्रयत्न करून या सातारा जिल्ह्यांमध्ये ऑल इंडिया पॅंथर सेनेचे वादळ घराघरात नेतीन असे जिल्हाध्यक्ष आदित्य भाऊ गायकवाड यांनी सांगितले.,

