महाबळेश्वर तहसीलदारांच्या ढसाळ कारभाराच्या विरोधात ऑल इंडिया पॅंथर सेनेचे तहसीलदार कार्यालयावरती ढोल बजाव आंदोलन..,



महाबळेश्वर तहसीलदारांच्या ढसाळ कारभाराच्या विरोधात ऑल इंडिया पॅंथर सेनेचे तहसीलदार कार्यालयावरती ढोल बजाव आंदोलन..,

महाबळेश्वर प्रतिनिधी

गेल्या अनेक दिवसांपासून महाबळेश्वर तालुक्यातील लोकांचे रखडलेले प्रश्न पावसामुळे झालेली अतिदृष्टी महाबळेश्वर तालुक्यातील इको सेन्सिटिव्ह झोन असतानाही व जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश नसतानाही इको सेन्सिटिव्ह झोन मध्ये उभारण्यात येत असलेल्या सिमेंट काँक्रीटची जंगले त्याच प्रकारे भिलार ग्रामपंचायत मध्ये पवार तलाठी यांच्या वरती वरिष्ठांनी नेमलेला एक विशाल शेलार नावाचा एजंट या आणि अशा अनेक सामाजिक विषयांना धरून ऑल इंडिया पॅंथर सेनेने तहसीलदारांच्या ढसाळ कारभाराच्या विरोधात ढोल बजाव आंदोलन केले मात्र आंदोलन सुरू होताच तहसीलदार कार्यालयात शुकशुकाट पाहायला मिळाला, या आंदोलनाची तीव्रता आणि दसका तहसीलदारांनी इतका घेतला असावा? की तहसीलदार कार्यालयात शुकशुकाट पाहायला मिळत होता आंदोलनावेळी तहसीलदार यांच्या कार्यपद्धती वरती प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले तहसीलदार यांच्या विभागातील काही अधिकाऱ्यांच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या विशाल शेलार नावाच्या एजंट्यावरती गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी देखील या वेळेस करण्यात आली मौजे भोसे येथील सर्वे नंबर 31/व फायनल प्लॉट नंबर 63/ मध्ये जिल्हाधिकाऱ्यांची कुठली परवानगी नसताना सुरू असलेले बेकायदेशीर अनधिकृत बांधकाम थांबवण्यात याव या संदर्भात देखील घोषणा देण्यात आल्या पुढे जाऊन ऑल इंडिया पॅंथर सेनेचे जिल्हाध्यक्ष आदित्य गायकवाड म्हणाले आंदोलनाची तीव्रता इतकी आहे की आमचं निवेदन देखील स्वीकारायला या ठिकाणी कुठलाही अधिकारी उपलब्ध नाही आणि म्हणून आम्हाला तहसीलदारांनी दिलेले पत्र हे पोलिसांमार्फत आम्हाला देण्यात येणार आहे असे तहसीलदार यांनी फोनवरून पोलिसांना सांगितले आहे परंतु या ठिकाणाहून आंदोलनाच्या दिवशी जरी तहसीलदार निघून गेल्या असतील त्यांचे सर्व कर्मचारी या ठिकाणाहून निघून गेले असतील तरी देखील आमची अन्यायाविरुद्धची लढण्याची क्षमता कमी होणार नाही एक नव्हे तर अशा अनेक आंदोलने या तहसीलदार कार्यालयाच्या बाहेर आम्ही उभारून असून गोरगरिबांच्या हितार्थ प्रश्न मांडण्याचे काम सुरूच ठेवणार आहोत, तर अनमोल कांबळे म्हणाले तहसीलदारांनी तात्काळ अतिवृष्टीमुळे तालुक्यामध्ये झालेल्या नुकसान भरपाई चे पंचनामे करावेत त्याच प्रकारे वैयक्तिकरित्या समाजामध्ये जनजागृती करणाऱ्या कार्यकर्त्यांच टार्गिटीकरण थांबवावे मौजे भिलार तलाठी कार्यालयात कार्यरत असणाऱ्या विशाल शेलार नावाच्या एजेंडा वरती तात्काळ गुन्हा दाखल करण्यात यावे या आणि अशा अनेक मागण्यांचे निवेदन एक दिवसीय ढोल बजाव आंदोलन करून तहसीलदार यांच्या रसा कारभाराचा निषेध करून समाप्त करण्यात आले..,