महाबळेश्वर तालुक्यातील पर्यावरणाचे नियम धाब्यावर बसवल्यास आंदोलन करून ऑल इंडिया पॅंथर सेनेचे जिल्हाध्यक्ष आदित्य गायकवाड यांचा तहसीलदार महसूल यंत्रणेला इशारा
महाबळेश्वर प्रतिनिधी
महाबळेश्वर तालुका हा अत्यंत संवेदनशील व इको सेन्सिटिव्ह झोनच्या नियमाने गजबजलेला तालुका असून पर्यावरणाने भहरलेला तालुका आहे मात्र या पर्यावरणाला बाहेरून आलेल्या धनदांडग्यांची नजर लागली असून स्थानिक दलालांकडून पर्यावरणाची हत्या करून तालुका उध्वस्त करण्याचे काम सध्याच्या परिस्थितीत चालू असल्याचे निदर्शनास येत आहे, त्याच अनुषंगाने ऑल इंडिया सेनेचे सातारा जिल्हाध्यक्ष आदित्य गायकवाड यांचा महाबळेश्वर दौरा असताना सतीश गणपत कदम यांनी मौजे भोसे येथील सर्वे नंबर 31/प्लॉट नंबर 63/ मध्ये जे भले मोठे भोसे भिलार रोड लगत अनाधिकृत बांधकाम उभारले आहे त्या बांधकामाच्या अनुषंगाने रस्त्यावरती टाकलेली दगडे त्या दगडातील एक दगड हा चक्क जिल्हाध्यक्षांच्या गाडीवरती आला असल्याने जिल्हाध्यक्षांसह कार्यकर्त्यांना इजा होता होता वाचली असून त्या अनुषंगाने जिल्हाध्यक्ष आदित्य गायकवाड यांनी महाबळेश्वर तहसीलदार यांना निवेदन दिले आहे निवेदनात म्हटले आहे की माझा प्लॉट येणे आहे व हा येणे 1988 चा येणे नकाशा दाखवून सतीश गणपत कदम व त्यांचा एक दलाल तहसीलदार यंत्रणेची व महसूल यंत्रणेची दिशाभूल करण्याचे काम करत आहे व सतीश गणपत कदम यांच्याकडून शासनाची दिशाभूल करण्याचे काम सुरू आहे या प्लॉटला जिल्हाधिकाऱ्यांचे जोता प्रमाणपत्र फाळणी नकाशा फायनल येणे प्लॅन अथवा आदेश कुठल्याही प्रकारचा नसल्याने शासनाची पूर्णपणे दिशाभूल करण्याचे काम सतीश गणपत कदम व त्यांच्यासोबत असणाऱ्या त्यांच्या हस्तकाकडून करण्यात येत असून याला खतपाणी घालण्याचं काम गाव कामगार तलाठ्यापासून तहसीलदार कार्यालयातील महसूल यंत्रणा करत असल्याचे निदर्शनास येत आहे व त्याच अनुषंगाने येत्या आठ दिवसांमध्ये या बेकायदेशीर बांधकामावरती कारवाई न झाल्यास तहसीलदार यांच्या कार्यालयासमोर घंटानात आंदोलन करण्यात येईल याची दक्षता तहसीलदारांनी घ्यावी व लवकरात लवकर कारवाई करावी., तर अनमोल कांबळे म्हणाले महाबळेश्वर महसूल यंत्रणेला ग्रहण लागल आहे की काय आम्हाला कळत नाही जाणीवपूर्वक तक्रारदारांचे अर्जावरती या कार्यालयामध्ये कारवाया होत नाहीत कर्मचारी वर्ग सांगतो की तहसीलदार यांचा आदेश आहे कार्यकर्त्यांच्या तक्रारी अर्जांवरती अजिबात कारवाया करायच्या नाहीत हे गौड बंगाल आम्हाला कळत नाही एअरलाइन्स कंपनीचा मालक असणारा अजय चौधरी सारखा माणूस तहसीलदारांना भेटतो परंतु सामान्य कार्यकर्ता तहसीलदारांना भेटू शकत नाही ही या महाबळेश्वर तालुक्याची परिस्थिती आहे तहसीलदार कारवाई करतील का नाही हे माहीत नाही परंतु न्याया करिता आणि स्वाभिमाना करिता धनदांडग्यांवरती कारवाई न झाल्यास आम्ही मात्र तहसीलदारांच्या दालना बाहेर आंदोलन करू याची आम्ही मात्र ग्वाही देतो असे अनमोल कांबळे म्हणाले कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत आंदोलनाची मोहीम ठरवल्याचे निदर्शनास आले.,

