ऑल इंडिया पॅंथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाई केदार यांच्या नेतृत्वाखाली सातारा जिल्हाध्यक्ष आदित्य गायकवाड यांचे सातारा जिल्हाधिकारी कार्यालया बाहेर 108 ॲम्बुलन्स मध्ये रुग्णांना सेवा देणाऱ्या मंदा सपकाळ यांना न्याय देण्यासाठी बेमुदत धरणे आंदोलन सुरूच.,



ऑल इंडिया पॅंथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाई केदार यांच्या नेतृत्वाखाली सातारा जिल्हाध्यक्ष आदित्य गायकवाड यांचे सातारा जिल्हाधिकारी कार्यालया बाहेर 108 ॲम्बुलन्स मध्ये रुग्णांना सेवा देणाऱ्या मंदा सपकाळ यांना न्याय देण्यासाठी बेमुदत धरणे आंदोलन सुरूच.,

प्रतिनिधी
अनमोल कांबळे

सातारा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर ऑल इंडिया पॅंथर सेनेचे सातारा जिल्हाध्यक्ष आदित्य भाई गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली भुईंज येथील 108 या ॲम्बुलन्स मध्ये रुग्णांना सेवा देणाऱ्या डॉक्टर मंदा सपकाळ यांचा मानसिक छळ करणाऱ्या त्यांच्या विभागातील वरिष्ठ डॉक्टरांकडून मंद सपकाळ यांचा छळ होत असल्याने यांच्या साठी ऑल इंडिया पॅंथर सेनेचे जिल्हाध्यक्ष आदित्य गायकवाड त्यांच्यासोबत भर पावसामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले असल्याने जोपर्यंत न्याय मिळत नाही मंदा सपकाळ यांचा छळ करणाऱ्या त्यांच्या विभागातील वरिष्ठ डॉक्टरांन वरती उच्चस्तरीय कारवाई होत नाही तोपर्यंत बेमुदत धरणे आंदोलन मागे घेणार नाही, असे ध्येय साधून ऑल इंडिया पॅंथर सेनेचे जिल्हाध्यक्ष आदित्य गायकवाड यांनी सांगितले आहे, आज डॉक्टर दिन असून या डॉक्टर दिना दिवशी डॉक्टरांची ही अवस्था असेल तर डॉक्टर या शब्दाला काळिंबा फसणारी घटना या महाराष्ट्रामध्ये घडली आहे, पाटण येथील दोन टाक्याचे ऑपरेशन करतो असे सांगून संपूर्ण पोट फाडणाऱ्या डॉक्टर ननावरे डॉक्टर दुबे यांच्या वरती देखील निलंबनाची कारवाई करून गुन्हे दाखल करा अशी देखील मागणी आदित्य गायकवाड यांच्या माध्यमातून जिल्हाधिकारी जितेंद्र दुडी यांच्याकडे करण्यात आली असल्याचे आदित्य गायकवाड यांनी सांगितले आहे, ही लढाई सर्वसामान्य जनतेच्या अस्मितेची लढाई आहे, ही लढाई सर्वसामान्यांच्या हिताची लढाई आहे आणि आम्हाला पूर्णपणे विश्वास आहे डॉक्टर दुबे डॉक्टर ननावरे यांच्यावरती लवकरात लवकर जिल्हाधिकारी कारवाई करतील त्यांना निलंबित करतील आणि आरोग्य विभागामध्ये होणाऱ्या भ्रष्टाचाराला महिलांच्या होणाऱ्या मानसिक छळाला आळा घालतील कारण आम्हाला संविधानावरती पूर्ण विश्वास आहे, आणि म्हणून संविधानाच्या नियमानुसार जिल्हाधिकारी न्याय देतील गुन्हेगार डॉक्टरांना अजिबात पाठीशी घालणार नाहीत आणि जर का अशी चूक इथल्या प्रस्थापित यंत्रणेने केली तर आम्हाला न्याय मागण्याकरिता मुंबई मंत्रालय आरोग्य विभागाच्या बाहेर ऑल इंडिया पॅंथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाई केदार यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन करावे लागेल व प्रशासनाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावरती मांडावा लागेल याची प्रशासनाने नोंद घ्यावी असे ऑल इंडिया पॅंथर सेनेचे सातारा जिल्हाध्यक्ष आदित्य भाई गायकवाड यांनी सांगितले आहे,