पुणे येथील झी 24 तास शेतकरी परिषद आयोजित कृषी पर्यटन या विषयावरती पुणे पर्यटन संचालनालयाच्या प्रमुख सुप्रिया करमरकर (दातार) यांनी मार्गदर्शन केल्याप्रकरणी झी 24 तास कडून मंत्री महोदयांच्या उपस्थितीमध्ये सन्मान,.



पुणे येथील झी 24 तास शेतकरी परिषद आयोजित कृषी पर्यटन या विषयावरती पुणे पर्यटन संचालनालयाच्या प्रमुख सुप्रिया करमरकर (दातार) यांनी मार्गदर्शन केल्याप्रकरणी झी 24 तास कडून मंत्री महोदयांच्या उपस्थितीमध्ये सन्मान,.

पुणे प्रतिनिधी

झी 24 तास कडून शेतकरी परिषदेचे आयोजन केलेले होते त्यामध्ये कृषी पर्यटन या विषयावर सुप्रिया करमरकर (दातार) यांनी मार्गदर्शन केले सदर मार्गदर्शनामध्ये ‌ करमरकर यांनी सांगितले भारत हा कृषी प्रधान देश असून शेतीचे महत्व समाजातील वंचित पिढीत शोषित छोट्यातल्या छोट्या घटकापर्यंत पोहोचले पाहिजे आधुनिक तंत्रज्ञानाच्या साह्याने शेती विकसित कशी करता येईल व शेतीमध्ये नवनवीन तंत्रज्ञान वापरून उपाययोजना कशा करता येतील व त्याचा फायदा छोट्यातल्या छोट्या सर्वसामान्य शेतकऱ्याला कसा होईल याकडे आपण सर्वांनी लक्ष दिले पाहिजे त्याच बरोबर राज्यांमध्ये पर्यटनाच्या दृष्टीने महाबळेश्वर लोणावळा या ठिकाणी मधमाशांच्या साह्याने मध पेठ्यान मध्ये पोळ्यांचे जाळे कसे निर्माण करून शुद्ध मत मिळेलच परंतु शेतकऱ्यांच्या घरात देखील आर्थिक सुबत्ता कशी वाढेल याकडे भर द्यावा त्याचप्रमाणे नुकतेच आपण पाहतो आपल्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी ज्याप्रकारे बांबू लागवड हा शेतकऱ्यांसाठी एक भक्कम शेतकरी बनण्याकरिता एक नवीन उपाययोजना आणलेली आहे त्या उपाय योजनेचा समाजातल्या छोट्यातल्या छोट्या घटकांनी लाभ घ्यावा कारण आपण पाहतो एखाद्या शेतकऱ्यांने आत्महत्या केल्यानंतर प्रशासनातले अधिकारी आपल्यातले लोक सांत्वन करण्याकरिता जातात त्यावेळेस त्या शेतकऱ्याचा मुलगा उठून उभा राहतो आणि त्या अधिकाऱ्यांना त्या लोकांना प्रश्न विचारतो तुम्ही माझा मेलेला मला बाप परत आणून देणार आहात का? त्या वेळेस कळतं शेतकरी का जगळतो कशासाठी जगळतो आणि का जगतो आपुलकीची जाणीव झाली की माणसं जोडण्याचा ओघ वाढतो आणि तो कायम ठेवायचा असेल तर आपुलकी आपल्याजवळ ठेवली पाहिजे, अशाप्रकारे मार्गदर्शन करत व्यासपीठावरती असणाऱ्या व समोर बसलेल्या मान्यवरांची मने जिंकत सन्मानचिन्ह पटकवण्याचा मान हा पुण्यातील पर्यटन संचालनालय विभागाच्या प्रमुख सुप्रिया करमरकर (दातार) यांनी फडकवला,