पोशो कार अपघात प्रकरणातील अग्रवाल कुटुंबाच्या नावे असणाऱ्या एम पी जी क्लब महाबळेश्वर मधील उभारलेल्या अनाधिकृत टेंड वरती सातारा जिल्हा प्रशासनाचा अखेर हातोडा,
प्रतिनिधी
अनमोल कांबळे
पुणे पोशो कार अपघात प्रकरणातील अग्रवाल कुटुंबाच्या नावे असणाऱ्या एम पी जी क्लब महाबळेश्वर रिसॉर्ट मधील उभारलेल्या अनाधिकृत टेंड हाऊस रिसॉर्ट वरती सातारा जिल्हा प्रशासनाने पहाटेच्या सुमारात अखेर हातोडा उभारला आहे ही कारवाई अत्यंत गुप्त पद्धतीमध्ये पोलीस बंदोबस्तात पहाटेच्या सुमारास करण्यात आली आहे, या कारवाईमुळे महाबळेश्वर शहरासह परिसरातील धनदांडग्यांचे बाहेरील शासकीय अधिकाऱ्यांचे व लँड माफियांचे रिसॉर्ट असणाऱ्या व बेकायदेशीर हॉटेल असणाऱ्या माफियांचे चांगलेच धाबे दणाणले असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे, पुणे पोशो कार अपघातानंतर अग्रवाल कुटुंबाचे सगळे काळे पिवळे धंदे बाहेर पडायला लागले असल्याचेही चित्र पाहायला मिळत आहे, त्याच पार्श्वभूमी वरती महाबळेश्वर मध्ये देखील अग्रवाल कुटुंबाच्या नावे असणाऱ्या मिळकतींची चौकशी होऊन मिळकती सील होणार ? असल्याचीही चर्चा संपूर्ण परिसरामध्ये असून येत्या काळामध्ये अग्रवाल कुटुंबाच्या पैशाच्या व जबरदस्ती गुंडांच्या जोरावरती चालणाऱ्या दहशतीला प्रशासन आवर घालणार की ? पुन्हा एकदा अग्रवाल कुटुंब दुधातल्या माशीगत कायद्याच्या चौकटीतून उडून जाणार हे बघणं गांभीर्याचे ठरणार आहे,

