ऑल इंडिया पॅंथर सेनेचे दिनांक 8/8/2024 रोजी महाबळेश्वर तहसील कार्यालया बाहेर जिल्हाध्यक्ष आदित्य गायकवाड त्यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मण पोळ अनमोल कांबळे यांच्या सहा ढोल बजाव आंदोलन होणार .,
महाबळेश्वर प्रतिनिधी
महाबळेश्वर तालुक्यात पावसामुळे झालेल्या नुकसान भरपाई चे शेतकऱ्यांचे तात्काळ पंचनामे करा लाडकी बहीण योजने अंतर्गत अर्ज करण्याकरिता होणाऱ्या गर्दीचे नियोजन करा इको सेंसिटिव्ह झोन मध्ये होणाऱ्या झाडांची वृक्षतोड थांबवा तक्रारदारांच्या अर्जांचे निर्मूलन करा मौजे खिंगर येथील 83 /3 /5/ मध्ये बांधकाम परवान्याच्या नावाखाली नार्वेकर उभारत असणारे बेकायदेशीर इमारतीचे बांधकाम थांबवा एकतर्फे मनमानी कारभार थांबवा द्वेषापोटी कार्यकर्त्यांना टार्गेट करणे थांबवा या आणि अशा अनेक मागण्यांकरिता ऑल इंडिया पॅंथर सेनेच्या वतीने राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाई केदार यांच्या सूचनेनुसार सातारा जिल्हाध्यक्ष आदित्य गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक 8/8/2024 रोजी ढोल बजाओ आंदोलन महाबळेश्वर तहसील कार्यालयाच्या बाहेर करण्यात येणार आहे या आंदोलनामध्ये अनमोल कांबळे लक्ष्मण पोळ सह अनेक कार्यकर्ते उपस्थित राहणार असल्याचे अनमोल कांबळे यांच्या वतीने सांगण्यात आले आंदोलनाचा झंझावात हा संपूर्ण जिल्ह्यात उठणार असून या विद्रोहाचा विस्फोट करण्यासाठी हा पॅंथर इथे आला आहे व तो विजयी होऊन जाईल अशी ग्वाही जिल्हाध्यक्ष आदित्य गायकवाड यांनी यावेळी दिली तहसीलदारांना आंदोलनाचे निवेदन सुपूर्त करून आंदोलनाची पुढची रणनीती ही आठ तारखेच्या आंदोलनामध्ये दिसेल असे जिल्हाध्यक्ष आदित्य गायकवाड यांनी सांगितले..,

