प्रभागांमध्ये रखडलेला विकास पाहता लोकांच्या आग्रा खातीर निवडणुकीला सामोरे जावे लागेल आनंद कांबळे.



प्रतिनिधी पांचगणी

प्रभागांमध्ये रखडलेला विकास पाहता लोकांच्या आग्रा खातीर निवडणुकीला सामोरे जावे लागेल आनंद कांबळे.

नगरपालिका नगरपरिषद निवडणुकीसंदर्भात सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईन्स 16 सप्टेंबर रोजी जाहीर झाल्यानंतर 31 जानेवारीच्या आत निवडणुका होणार हे निश्चित झाल्यानंतर आता आपापल्या प्रभागासह वॉढ प्रणालीमध्ये इच्छुक उमेदवारांनी आपला गोपनीय प्रचार सुरू केला असल्याचे पाहायला मिळाले असून पाचगणीतील सामाजिक कार्यकर्ते आनंद कांबळे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे, आनंद कांबळे म्हणाले नगरपालिका पंचवार्षिक निवडणुका गेल्या चार वर्षापासून न झाल्यामुळे शहरातील वॉढ सह प्रभागातील अनेक विकास कामे प्रलंबित असल्याची खंत आनंद कांबळे यांनी व्यक्त केली आनंद कांबळे म्हणाले निवडणूक लढवण्याची मुळीच इच्छा नाही मात्र लोकांच्या आग्रा खातीर प्रभागामध्ये रखडलेल्या विकासाला चालना देण्याकरिता लोकांचा आग्रह आहे मी निवडणूक लढवावी अनेक वर्ष निष्ठेने राष्ट्रवादी पक्षात काम करून देखील माझ्या प्रभागाचा विकास झाला नाही लोकांचे प्रश्न आजही प्रलंबित आहेत प्रभागामध्ये सांडपाण्याच्या गटाचे नियोजन नाही तरुणांच्या हाताला रोजगार नाही हे प्रश्न अनेक वर्षापासून प्रलंबित असून याकडे लक्ष केंद्रित करणारे प्रभावशाली नेतृत्व अध्याप लोकांना मिळाले नसून लोकांचा आग्रह असल्यास व लोकांनी आपल्याला संधी दिल्यास शहराच्या नगराध्यक्ष लक्ष्मी कराडकर यांच्या पॅनल मधून निवडणुकीला सामोरे जाऊन विजय मिळवू असे पाचगणीतील भीमनगर मधील सामाजिक कार्यकर्ते आनंद कांबळे यांनी सांगितले.