मौजे -कासवंड.ता.- महाबळेश्वर जि.- सातारा. येथे स्वातंत्र्याचा 75 वा अमृतमहोत्सव सोहळा उत्साहात संपन्न…



महाबळेश्वर प्रतिनिधी….

मौजे -कासवंड येथे ग्रामपंचायत कासवंड व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कासवंड यांच्या संयुक्त विद्यमानाने स्वातंत्र्याचा 75 वा अमृतमहोत्सव शासनाच्या निर्देशानुसार दिनांक 13 ऑगस्ट पासून सकाळी फार मोठ्या उत्साहात सर्व ग्रामस्थांनी मा.ग्रामसेवक यांच्या सर्व सूचनांचे पालन करत घरोघरी राष्ट्रध्वज उभारण्यात आले त्याचा कोणत्याही प्रकारे अवमान होणार नाही याची दक्षता सर्व ग्रामस्थांनी घेतली. त्यानंतर जिल्हा परिषद शाळा कासवंड व जिल्हा परिषद शाळा गोळेवाडी येथे स्वतंत्र रित्या गोपाळ पंगत. वृक्षारोपण.वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा,असे विविध उपक्रम मुख्याध्यापक दानवले सर, नगरे सर, व भिलारे सर, यांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात सर्व स्पर्धा पार पडल्या मुलांनीही उस्फुर्त पणे भाग घेतला. आज दिनांक 15 रोजी सकाळी ग्रामपंचायत कार्यालय कासवंड येथे मा. सरपंच श्री जनार्दन चोरमले यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडले तर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे नुकतीच भारतीय सैन्यात कालच बढती मिळालेले श्री दिलीप पवार यांच्या पत्नी सौ शोभा पवार यांच्या हस्ते ध्वज फडकविण्यात आला.तसेच गोळेवाडी मध्ये तुकाराम गोळे व हिराबाई शेटे यांनीही आपल्या वयाची 75 वर्षे पूर्ण केली असल्याने त्यांच्या हस्ते पूजन करून ध्वजारोहण साजरे करण्यात आले. तसेच ग्रामदैवत श्रीकालभैरवनाथ मंदिर प्रांगणात तंटामुक्त अध्यक्ष श्री आनंद पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले तसेच गेल्या आठवडा भर विविध शालेय स्पर्धा पार पडलेल्या मुलांचे प्रत्येक स्पर्धेत प्रत्येकी 3 नंबर व एक उत्तेजनार्थ असे नंबर काढून ग्रामस्थांन च्या वतीने विध्यार्थ्यांचा सन्मान व प्रोत्साहन देण्यासाठी आकर्षक अशा स्वरूपाच्या ट्रॉफी देण्यात आल्या तसेच ग्रामपंचायत व ग्रामस्थ मंडळ कासवंड यांच्या संयुक्त विद्यमाने गावातील जेष्ठ नागरिक 75 वय वर्षे पूर्ण केलेल्या स्त्री व पुरुष यांचाही सत्कार करण्यात आला. तसेच काही ग्रामस्थांनी आपापले मनोगत व्यक्त केले गावाची माहिती तरुण पिढीला मिळावी म्हणून ती सर्व माहिती शंकर पवार यांनी सांगितली तसेच भिलारे गुरुजी. लक्षुमन चोरमले (नाना), गणपत पवार, विठ्ठल पवार,संदीप पवार.यांनी आपापली मनोगत व्यक्त केलीत.
तसेच संपूर्ण या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी दिनानिमित्त ग्रामसेवक श्री विजय राजपुरे.सरपंच श्री जनार्दन चोरमले, उपसरपंच श्री रमेश पवार, ग्रामपंचायत सदस्य श्री निलेश गोळे,सौ.जनाबाई गोळे,सौ,प्रियंका पवार, सौ.छाया चोरमले, ग्रामस्थ गणेश पवार. तुकाराम पवार. संदीप पवार. प्रतीक पवार. श्रीरंग पवार. विनायक पवार. सुनील पवार. अंकुश पवार. गणेश ढेबे ,वसंत चोरमले, शांताराम ढेबे. बापू पवार, विलास पवार,नितीन चोरमले, शंकर गोळे, सदाशिव गोळे, एकनाथ गोळे, चंदू शेटे, अक्षय गोळे, कोंडीबा डोईफोडे, शालेय व्यवस्थापण समिती अध्यक्ष श्री सचिन चोरमले.महिला मंडळ,आशा सेविका ,अंगणवाडी सेविका, सर्व शिक्षक शिक्षिका, सिआरपी, कर्मचारी वर्ग, या सर्वांनी अत्यंत उत्साहात स्वातंत्र्याचा 75 वा अमृतमहोत्सव दिन साजरा करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले सर्व सोहळा उत्साहात पार पडला….