पाचगणी प्रतिनिधी…
*पाचगणी शहर आणि परिसरातील सुजाण नागरिकांन साठी 10 वर्षांपूर्वी श्रीमती मीनालबेन मेहता कॉलेज जे तत्कालीन प्राचार्य डॉ अरुण गाडे यांच्या संकल्पनेतून पाचगणी शहरातील माता बंधू भगिनी जेष्ठ नागरिक विध्यार्थी यांच्या करिता शिक्षणमहर्षी डॉ बापूजी साळुंखे व्याख्यानमाला सुरू करण्यात आली. आणि आज दहा वर्षे कॉलेज च्या वतीने आजही कायम आहे ही व्याख्यानमाला चालू करण्याचे एकच उद्दिष्ट होते की तळागाळातील बहुजनांच्या मुलांना त्यांच्या हक्काचे शिक्षण मिळावे कुणीही शिक्षणापासून वंचित राहता कामा नये या साठी शेवटच्या श्वासापर्यंत झटणाऱ्या शिक्षणमहर्षी आदरणीय डॉ बापूजी साळुंखे अशा महापुरुषाचे आपल्याला कायम स्मरण रहावे. म्हणून ही तीन दिवसीय व्याख्यानमाला कॉलेज च्या वतीने ही परंपरा कायम ठेवत आजही आयोजित करण्यात येते. पाचगणी शहर व परिसरातून श्रोत्यांची उपस्थिती मोठ्या प्रमाणावर असते. तसेच वक्ते ही जागतिक दर्जाचे असतात आणि सामाजिक. ऐतिहासिक. आधुनिक तंत्रज्ञानाचा काळ.अशा प्रकारचे ताकतीने समाजहिताचे समाजातील प्रत्येक घटकाला योग्य दिशा मार्गदर्शक असणारे विचार या विषयावर वक्ते मांडत असतात. मीनालबेन मेहता कॉलेज चे आदरणीय मा.प्राचार्य सर्व गुरुवर्य.माजी विध्यार्थी संघटना.पाचगणी शहर विद्यापीठ प्रतिनिधी.व्याख्यानमाला समिती चे सर्व माजी अध्यक्ष सदस्य .व व्याख्यानमाला समतीचे नूतन अध्यक्ष श्री प्रकाश गोळे. उपाध्यक्ष कार्याध्यक्ष स्वागत अध्यक्ष यांच्या वतीने पाचगणी शहर व परिसरातील सर्व नागरिक यांना
नम्र आवाहन करण्यात येत आहे. मे महिन्यात गुरवार ते शनिवार दिनांक ०५, ०६ आणि ०७ रोजी आपली व्याख्यानमाला श्रीमती मीनालबेन मेहता कॉलेज पाचगणी येथे आयोजित करीत आहोत.या व्याख्यानमालेसाठी पहिले पुष्प शिवव्याख्याते मा. प्रशांत देशमुख, (मुंबई) दुसरे पुष्प. कथाकार बाबासाहेब परीट (बत्तीस-शिराळा) आणि तिसरे पुष्प ख्यातनाम वक्ते मा.वसंत हंकारे सादर करीत आहेत. या व्याख्यानमालेत प्रत्येक दिवशी तीन भाग्यवान श्रोते निवडून त्यांना बक्षीस दिले जाणार आहे. तरीआपण सर्वांनी उपस्थित रहावे.ही विनंती.
समन्वयक
शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे व्याख्यानमाला समिती, पाचगणी…
शिक्षणमहर्षी डॉ बापूजी साळुंखे व्याख्यानमाला

