अनमोल कांबळे
पाचगणी प्रतिनिधी
पाचगणीच्या माजी नगराध्यक्ष यांचे विश्वासू सहकारी मानले जाणाऱ्या कोंडाळकर यांच्या कडून सिल्वर ओक सह निलगीरि च्या झाडांची मोठ्या प्रमाणात कत्तल झाल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे सोमवार मंगळवार असताना देखील व संपूर्ण शासकीय कार्यालय चालू असताना पाचगणीच्या माजी नगराध्यक्ष यांचे निकटवर्तीय मानले जाणारे कोंढाळकर यांच्या कडून बेकायदेशीर बांधकामासह खुलेआम झाडांची कत्तल करण्याचे काम माजी नगराध्यक्ष यांच्या आशीर्वादाने चालू आहे? अशी चर्चा संपूर्ण शहरांमध्ये चालू आहे, नगराध्यक्षांनी नियमांचा भंग करून आपली काळकीर्द तर गाजवली परंतु काळकीर्द संपल्यानंतर देखील पुन्हा एकदा कार्यकर्त्यांच्या खांद्या वरती बंदूक, ठेवून शासकीय नियमांचा भंग करण्याचे काम सध्याही चालू ठेवले असल्याचे चित्र दिसून येत आहे, पहाटेच्या सुमारास झाडांची कत्तल करत असताना सकाळी 11:00 च्या नंतर व शासकीय कार्यालय चालू होताच पाचगणी नगरपालिकेचे मुख्याधिकारी गिरीश दापकेकर व फॉरेस्ट कार्यालयातील कुलकर्णी व त्यांचे सहकारी काळे हे पाचगणीच्या तत्कालीन नगराध्यक्ष यांचे विश्व सहकारी कोंडाळकर यांच्या वरती कारवाई करणार का?? की पुन्हा एकदा ज्या प्रकारे मोजे भौसे येथील झाडांची कत्तल केली उत्खनन केलं असताना देखील काळे यांच्या अहवालानुसार याच धनदांडग्यांनी 10/ झाडे लावली आहेत असा पुन्हा एकदा खोटा रिपोर्ट वरिष्ठ कार्यालयात पाठवणार कि काय अस असणारा प्रश्न उपस्थित झालेला आहे, आणि म्हणून आता अधिकार्या च्या कारवाईकडे पाचगणी करांचे लक्ष लागलेले आहे, जर का अधिकाऱ्यांनी कारवाईमध्ये हलगर्जीपणा केला व आर्थिक तडजोडी पोटी आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न केला तर पाचगणी नगरपालिके सह फॉरेस्ट कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केल्याशिवाय आम्ही शांत राहणार नाही असे अनमोल कांबळे यांनी सांगितले,

