पाचगणी प्रतिनिधी…
सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या महाबळेश्वर तालुक्यातील मौजे- कासवंड या गावी आज दिनांक 14 जून रोजी वाई- खंडाळा मतदार संघाचे लोकप्रिय मा. जननायक आमदार मकरंद आबा पाटील यांच्या फंडातून व महाबळेश्वर तालुक्यातील युवा नेतृत्व जिल्हा मध्यवर्ती बँकेचे विद्यमान संचालक श्री राजेंद्र राजपुरे यांच्या विशेष प्रयत्नातून आज मौजे कासवंड येथे ग्रामपंचायत नूतन इमारतीसाठी 10 लक्ष रुपये.चोरमले वाडी .गोळेवाडी. हिरवेवाडी. रस्त्याकरीता प्रत्येकी स्वतंत्र 15 लक्ष रुपये आमदार फंडातून मंजूर करण्यात आले असून या सर्व कामांचे आज भूमिपूजन सोहळा श्री राजेंद्र (शेठ )राजपुरे, महाबळेश्वर तालुका पंचायत समिती सभापती मा.श्री संजय(बाबा) गायकवाड, श्री नितिन(दादा) भिलारे, श्री प्रवीण भिलारे, या मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला तसेच श्री राजेंद्र शेठ राजपुरे यांनी मी कायम कासवंड व भागातील प्रत्येक गावाच्या विकासासाठी कायम कटिबद्ध आहे.तालुक्यातील प्रत्येक गावाचा विकास झाला पाहिजे महाबळेश्वर तालुका हा सामाजिक, सुसंस्कृत,आर्थिकदृष्ट्या अत्यंत सक्षम व सधन झाला पाहिजे. तसेच विविध विकास योजनांची माहिती दिली व प्रत्येक गावाने त्या योजनेच लाभ घ्यावा असे आवाहन सुद्धा केले. तसेच मा. सभापती संजय (बाबा) गायकवाड, यांनी आपले मनोगत व्यक्त करताना आदरणीय स्वर्गीय बाळासाहेब भिलारे दादा यांचीही आठवण करून दिली.तसेच श्री नितिन( दादा )भिलारे म्हणाले दादांनी एक कायम शिकवण दिली आहे आपल्या दारात आलेला माणूस कधीही रिकाम्या हाताने परत जाता कामा नये तो कोण आहे यापेक्षा त्याची गरज आणि आपली मदत लाखमोलाची आहे. आणि ही परंपरा मी आम्ही कायम अखंड चालूआहे व राहील तुम्ही कधीही हाक दया असा शब्द दिला आहे. आजच्या भूमिपूजन सोहळ्यास उपस्थित सर्व मान्यवर ग्रामस्थ, जेष्ठ नागरिक.युवावर्ग माता- भगिनी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. मा. सरपंच, मा. उपसरपंच, मा.ग्रामपंचायत सदस्य, विशेष सहकार्य मा. ग्रामसेवक श्री विजय राजपुरे, कर्मचारी वर्ग. या सर्वांचे सहकार्याने भूमिपूजन सोहळा संपन्न झाला.
मौजे.कासवंड ता. महाबळेश्वर येथे आज रोजी 14 जून मा.जननायक आमदार मकरंद(आबा) पाटील यांच्या फंडातून आणि जिल्हा मध्यवर्ती बँकेचे विद्यमान संचालक श्री राजेंद्र(शेठ)राजपुरे यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर झालेल्या विविध विकासकामांचा भूमिपूजन सोहळा आज कासवंड येथे श्री राजेंद्र शेठ राजपुरे यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला.

