महाबळेश्वर तहसीलदार कार्यालयांमध्ये अस्लम खान तयार करत असलेल्या खोट्या सहमती पत्रांचा बाजार थांबवा-अनमोल कांबळे



महाबळेश्वर प्रतिनिधी

अस्लम खान नावाच्या व्यक्तीकडून तहसीलदार महाबळेश्वर कार्यालयामध्ये उपस्थित राहून खोटी संमती पत्र तयार करत मोठ्या प्रमाणात देशभरात पर्यटनासाठी व शिक्षणासाठी प्रसिद्ध असणाऱ्या पाचगणी परिसरा मध्ये शाळांना फसवून जमिनी खरेदी करण्याचा डाव अस्लम खान या नावाच्या व्यक्तीने रचनेला दिसून येत आहे इतकच काय तर शिक्षण क्षेत्रामध्ये देखील शाळेची दिशाभूल करून मुलांचे खोटे दाखले उपलब्ध करण्याचं कटकारस्थान हे या अस्लम खान नावाच्या व्यक्तीने रचलेल दिसून आहे परंतु स्थानिक एजंट सोबत या व्यक्तीचे लागे बंदे असल्याने या व्यक्तीला वाचवण्याचं काम स्थानिक प्रशासनातील अधिकारी करत आहेत की काय असा असणारा प्रश्न उपस्थित होतो मोठ्या प्रमाणात तहसीलदार महाबळेश्वर यांच्या समोर उपस्थित राहून अस्लम खान नावाचा व्यक्ती हा बाहेरून येऊन तहसीलदार महाबळेश्वर यांच्या समोर उपस्थित राहून खोटी संमती पत्र तयार करतो परंतु कुठल्याही प्रकारची कारवाई या व्यक्ती वरती होताना आम्हाला दिसत नाही कुठल्याही प्रकारचा गुन्हा दाखल होताना आम्हाला दिसत नाही म्हणून आमची तहसीलदार महाबळेश्वर यांना विनंती आहे व आम्ही आमच्या अर्जामध्ये नमूद देखील केलेल आहे तात्काळ अस्लम खान नावाच्या व्यक्ती वरती गुन्हा दाखल झाला पाहिजे आपल्या कार्यालयाच्या माध्यमातून त्यांची चोकशी झाली पाहीजे व त्यांने अशी किती खोटी संमतीपत्र आपल्यासमोर आपल्या कार्यालयामध्ये उपस्थित राहून तयार केलीत किती शेतकऱ्यांना फसवलं किती शाळेची दिशाभूल केली याची देखील चौकशी झाली पाहिजे आणि आम्हाला विश्वास आहे या संपूर्ण प्रकरणाची चौकशी होऊन तहसीलदार 100% या अस्लम खान वरती कारवाई करतील गुन्हा दाखल करतील आणि कारवाई करण्यास टाळाटाळ केल्यास संबंधित आरोपीला पाठीशी घालण्याचा प्रयत्न केल्यास आम्हाला पुढचा मार्ग मोकळा आहे हा देश संविधानिक विचाराने चालतो संविधानामुळे चालतो म्हणून कायद्याप्रमाणे आम्हाला आमचा अधिकार मागण्याचा अधिकार या देशाच्या संविधाने दिलेला आहे आणि तो आम्ही कायद्याच्या मार्गाने आंदोलनाच्या मार्गाने मागतच राहू असे अनमोल कांबळे यांनी सांगितले