पाचगणी शहरामध्ये येणार्या पर्यटकांना आकर्षित करण्याकरिता पाचगणी नगरपरिषदेच्या माध्यमातून मुख्याधिकारी गिरीश दापकेकर यांनी बसवलेली आर्टिफिशल पक्षी अखेर उडाले



पाचगणी शहरामध्ये येणार्या पर्यटकांना आकर्षित करण्याकरिता पाचगणी नगरपरिषदेच्या माध्यमातून मुख्याधिकारी गिरीश दापकेकर यांनी बसवलेली आर्टिफिशल पक्षी अखेर उडाले

पाचगणी प्रतिनिधी
अनमोल कांबळे

पाचगणी येथील पर्यटकांना आकर्षित करण्याकरिता व पाचगणीतील लोकांचे आकर्षण वाढवण्याकरिता पाचगणी नगरपालिकेच्या माध्यमातून मुख्याधिकारी गिरीश दापकेकर यांनी‌ पाचगणी शहरातील ठीक ठिकाणी आर्टिफिशियल प्राणी हे बसण्यात आले व हे प्राणी बसवल्यानंतर पाचगणीतील येणाऱ्या पर्यटकांना आपण सुंदर नगरी मध्ये आलो आहे याची जाणीव देखील झाली परंतु ही जाणीव केवळ काही दिवसांपूतीच होती की काय असा असणारा प्रश्न उपस्थित होतो याचे कारण मुख्य अधिकारी यांची विश्व सहकार्य असणारे नगरसेवक ठेकेदार कॉन्ट्रॅक्टर यांनी हे आर्टिफिशियल प्राणी नगरपालिकेच्या हद्दीतून गायब केलेले दिसून येत आहेत व हे प्राणी अनधिकृत बांधकाम पूर्ण केल्यानंतर मुंबई पुण्यातील येणाऱ्या धनदांडग्यांना गिफ्ट म्हणून देण्याचे काम या ठेकेदारांकडून केले जात आहे परंतु दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की पाचगणी करांचा पैसा मुख्याधिकाऱ्यांच्या हातात एकतर्फे सत्ता असल्याने मुख्य अधिकारी बेभानपणे या सत्तेचा दुरुपयोग करत पैसा उधळत आहेत याचे कारण जो ठेकेदार ब्लॅक लिस्ट मध्ये आहे ज्याला ठेका देऊ नका अशी पाचगणी नगरपालिकेमध्ये पत्र आहेत त्याच्या विरुद्ध तक्रारी दाखल आहेत आशा ठेकेदाराला केवळ टक्केवारी करता कि काय पुन्हा ठेका देण्याचं काम पाचगणी नगरपालिकेच्या मुख्याधिकारी यांनी केलेलं दिसून येत आहे आणि म्हणून आता पाचगणी करांच्या मनामध्ये प्रश्न उपस्थित झालेला आहे की पाचगणी नगरपालिकेचे मुख्याधिकारी गिरीश दापकेकर यांनी बसवलेले पक्षी तर उडून गेलेले आहेत परंतु आता पाचगणी नगरपालिका ही या भ्रष्टाचारामध्ये डुंबून जाते की काय असा असणारा प्रश्न सर्वसामान्य पाचगणी करांच्या मनामध्ये उपस्थित झालेला आहे व जिल्हाधिकारी स्वतःया प्रकरणांमध्ये लक्ष घालून मुख्यअधिकारी यांच्या वरती कारवाई करणार का ? असा देखील प्रश्न सर्वसामान्यांच्या मनामध्ये उपस्थित झालेला दिसून येत आहे