निलेश गोळे यांच्या संकल्पनेतून राजेंद्र शेठ राजपुरे यांच्या वाढदिवसानिमित्त पाचगणी येथील श्रीमती मीनलबेन मेहता कॉलेज येथे जिल्ह्यातील पहिल्या तुळशी बागीचे राजेंद्र शेठ राजपुरे यांच्या हस्ते उद्घाटन



निलेश गोळे यांच्या संकल्पनेतून राजेंद्र शेठ राजपुरे यांच्या वाढदिवसानिमित्त पाचगणी येथील श्रीमती मीनलबेन मेहता कॉलेज येथे जिल्ह्यातील पहिल्या तुळशी बागीचे राजेंद्र शेठ राजपुरे यांच्या हस्ते उद्घाटन

पाचगणी प्रतिनिधी

पाचगणी शिक्षणमहर्षी डॉ बापूजी साळुंखे व्याख्यानमाला सन 2021-2022 वर्ष 11 वे… याचे औचित्य साधून राजेंद्र शेठ राजपुरे यांच्या वाढदिवसानिमित्त निलेश गोळे यांच्या संकल्पनेतून सातारा जिल्ह्यातील पहिल्या तुळशी बागीचे उद्घाटन सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक राजेंद्र शेठ राजपुरे यांच्या उपस्थिती मध्ये आज करण्यात आले शिक्षणमहर्षी डॉ बापूजी साळुंखे यांनी संस्था स्थापन केल्यानंतर राज्यातीलच नवे तर देशातील बहुजनांना शिक्षणाचा आधार मिळाला आहे आणि म्हणून तुळस म्हणजे काय तुळशीचे पवित्र काय हे येणाऱ्या युवा पिढीला माहीत असणे अत्यंत गरजेचे आहे म्हणून ही संकल्पना सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक राजेंद्र शेठ राजपुरे यांच्या वाढदिवसानिमित्त आज आम्ही याठिकाणी राबवत आहोत खरतर संकल्पना या अनेक येतात अनेक जातात परंतु तुळशीची बाग ही संकल्पना नसून उज्ज्वल भविष्याला गतिमान करण्याची सुरवात आहे आणि ही संकल्पना याच पवित्र ठिकाणी होणे गरजेची होती ती आज आम्ही पूर्ण केलेली आहे असे निलेश गोळे यांनी सांगितले संकल्पना ऐकून घेत असताना या वेळी शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ श्री प्राचार्य अभयकुमार साळुंखे साहेब मिनलबेन मेहता कॉलेजचे प्राचार्य देसाई सर कार्यक्रमाचे अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते प्रकाश गोळे माजी विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष आणि अश्टोन होस्टेल चे प्रमुख अमर बिरामणे सर सामाजिक कार्यकर्ते अनमोल कांबळे मीनलबेन मेहता कॉलेजचे प्राध्यापक वांगीकर सर व सर्व प्राध्यापक व इतर सर्व मान्यवर उपस्थित होते