सातारा प्रतिनिधी
गोवा आग दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ ची तातडीने अंमलबजावणी करा काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी घेतली जिल्हाधिकारी संतोष पाटील यांची भेट..!
गोवा येथे नुकतीच घडलेली भीषण आग दुर्घटना ही संपूर्ण देशासाठी धोक्याची घंटा असून, अशा मानवनिर्मित आग दुर्घटना टाळण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन कायदा – २००५ प्रभावीपणे राबविणे अत्यावश्यक असल्याचा मुद्दा सातारा जिल्ह्यातील काँग्रेस महिला पदाधिकाऱ्यांनी ठामपणे उपस्थित केला आहे,या पार्श्वभूमीवर सौ. सत्वशिला पृथ्वीराज चव्हाण, सातारा जिल्हा काँग्रेस महिला अध्यक्ष सौ सुषमा राजे घोरपडे कराड तालुका दक्षिण काँग्रेस महिला अध्यक्ष, सौ. वैशाली जाधव तसेच ॲड. विकास बा. पाटील–शिरगांवकर यांनी सातारा जिल्हाधिकारी यांच्यासोबत सविस्तर चर्चा केली गोवा आग दुर्घटनेत अग्निसुरक्षा उपाययोजनांचा अभाव, अग्निशमन यंत्रणेची कमतरता तसेच प्रतिबंधात्मक आदेश नसल्यामुळे मोठी जीवितहानी झाल्याचे निदर्शनास आले. अशा दुर्घटना भविष्यात टाळण्यासाठी निवासी व व्यावसायिक इमारतींमध्ये अग्निशमन यंत्रणा, आग शोधक व आग प्रतिबंधक सुरक्षा साधने बंधनकारक करण्याबाबत जिल्हास्तरावर स्पष्ट आदेश काढण्याची मागणी यावेळी करण्यात आली या चर्चे दरम्यान जिल्हा प्रशासनाकडून माहिती अधिरान्वये लेखी उत्तर देण्यात आले असून, सन २००५ ते २०२५ या कालावधीत आपत्ती व्यवस्थापन कायदा अंतर्गत अग्नि सुरक्षेबाबत कोणतेही ठोस आदेश काढण्यात आले नसल्याची बाब स्पष्ट झाली. ही गंभीर बाब ॲड. विकास बा. पाटील शिरगांवकर यांनी जिल्हाधिकारी यांच्या निदर्शनास आणून दिली यावेळी बोलताना सौ. सत्वशिला पृथ्वीराज चव्हाण म्हणाल्या की, लोकांचे प्राण व मालमत्ता सुरक्षित ठेवणे ही प्रशासनाची सर्वोच्च जबाबदारी आहे व त्यासाठी २००५ साली संपूर्ण देशासाठी लागू करण्यात आलेल्या आपत्ती व्यवस्थापन कायद्याची अंमलबजावणी न झाल्यास गोव्यासारख्या दुर्घटना वारंवार घडतील, असा इशाराही त्यांनी दिला.
ॲड. विकास बा. पाटील शिरगांवकर यांनी स्पष्ट केले की, एलपीजी गळती, विद्युत शॉर्टसर्किट, तसेच असुरक्षित बांधकामांमुळे होणाऱ्या आग दुर्घटना या पूर्णपणे मानवनिर्मित व आहेत व प्रशासनाने तातडीने आदेश काढून कायद्याची सक्ती करावी, अशी ठाम मागणी त्यांनी केली लोकांची सुरक्षा हीच प्राथमिकता असून, गोवा आग दुर्घटनेतून धडा घेऊन प्रशासनाने आपत्ती व्यवस्थापन कायदा – २००५ ची प्रभावी अंमलबजावणी करावी, असा मुद्दा सौ. सत्वशिला पृथ्वीराज चव्हाण व ॲड. विकास बा. पाटील शिरगांवकर यांनी ठामपणे ऐरणीवर आणला असून पुढील जिल्हाधिकाऱ्यांच्या भूमिकेकडे लक्ष लागून राहिले आहे.

