जावली तालुक्यात वनविभागाचा हलगर्जीपणा चव्हाट्यावरती तरसाच्या भीतीने कुटुंब भयभीत
जावली प्रतिनिधी
किरण अडसूळ
जावली तालुक्यातील हूम गाव
या ठिकाणी एका कुटुंबातील दहा वर्षाच्या मुलावर तरसाने हल्ला केला होता त्यानंतर
आज दहा दिवस उलटूनही वन विभागातील अधिकाऱ्यांनी याची कसली दखल घेतलेली नसल्याचे दिसून येत आहे, वनविभाग त्या ठिकाणी कोणतीही यंत्रणा राबवताना दिसून येत नाही मग वनविभाग एका मोठ्या घातपाताची वाटपात आहे की काय? असं संतप्त सवाल ग्रामस्थ करत असताना दिसून येत आहे गावामध्ये नथुराम नवसरे हे कुटुंब इतके भयभीत झालेले आहे की दिवसाढवळ्या सुद्धा बाहेर येण्यास घाबरत असल्याचे दिसून येत आहे, कारण तरस आजही घराच्या आवती भोवतीने फिरताना दिसत आहे त्यामुळे या संपूर्ण कुटुंबाचे जनजीवन विस्कळीत झाल्याचे दिसून येत आहे, दहा दिवस झाले तरी देखील वन अधिकारी हे गावाकडे फिरकती नसल्याचे चित्र असल्याने ग्रामस्थांमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत, जर का वनविभागातील अधिकारी अशा प्रकारे ढसाळ कारभार करत असतील तर मात्र या वन अधिकाऱ्याचा बंदोबस्त करा वन विभाग कारवाई कधी करणार? असा देखील संतप्त सवाल उपस्थित झाला असल्याने वनविभाग आता या संपूर्ण घटनेकडे गांभीर्याने पाहणार का? हे बघणे उचित ठरणार आहे,

