जावली या शब्दाची व्युत्पत्ती जयवल्ली वृक्षवेलीचा प्रदेश या शब्दावरुन झाली.मात्र याच जावली मध्ये विनापरवाना खाण खोदण्याचे धाडस सुरू असून संबंधित व्यक्तीवर तात्काळ कारवाई करून खाण बंद करावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल श्री महेंद्र सपकाळ यांचे मा.तहसीलदार प्रशासनाला निवेदन..!



प्रतिनिधी पांचगणी

जावली या शब्दाची व्युत्पत्ती जयवल्ली वृक्षवेलीचा प्रदेश या शब्दावरुन झाली.मात्र याच जावली मध्ये विनापरवाना खाण खोदण्याचे धाडस सुरू असून संबंधित व्यक्तीवर तात्काळ कारवाई करून खाण बंद करावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल श्री महेंद्र सपकाळ यांचे मा.तहसीलदार प्रशासनाला निवेदन..

मौजे महातेमुरा ता जावली येथे बेकायदेशीर सुरु असणाऱ्या दगड खाण तात्काळ बंद करणे बाबत श्री. महेंद्र आनंदा सपकाळ राहणार शिवसेना शिंदे गट ता प्रमुख जावली राहणार मु. रुईघर पोस्ट दापवडी यांनी मा.तहसीलदार यांना निवेदन दिले आहे मौजे महातेमूरा येथे कोणतीही महसूल विभागाची परवानगी नसताना व सदरचा भू भाग हा पश्चिम घाट अभ्यास गटाने 2011 साली पश्चिम घाटातील गौण खनिज बाबत दिलेल्या अहवालात सदर प्रदेशात खोदकाम होऊ नये असे असताना अशी खोदकामे बेदिक्कत पणे प्रशासनाच्या नाकावर टिचून करतात कशी असा प्रश्न उपस्थित केला आहे सदर खणीतून प्रचंड प्रमाणात दगड काडून त्याची वाहतूक होत असल्याचे दिसून येते आहे तरी आपण तात्काळ सदर ठिकाणी भेट देऊन सदर खाण बंद करून संबंधित इस्मावर योग्य ती कार्यवाही करावी अन्यथा मा जिल्हाधिकारी सातारा यांचे दालनाच्या बाहेर ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे.असा तक्रार अर्ज दाखल केला आहे जावली तालुक्यातील बराचसा भाग हा सह्याद्रीच्या कुशीत वसलेला आहे अनेक प्रकारची जैवविविधता आढळून येते शिवाय शासनानेही अनेक प्रकारचे झोन आखून दिलेले आहेत या पार्श्वभूमीवर विनापरवाना अशा प्रकारे खाण खोदण्याचे धाडस करणे हे प्रशासनाला एक प्रकारे आवाहन आहे आजूबाजूला असणाऱ्या गावांन सोबतच नागरिक पाळीव प्राणी आणि नैसर्गिकरित्या असणाऱ्या वन्यजीव यांना याचा फार मोठ्या प्रमाणात खाणीच्या आवाजाने हानी पोहचते परंतु तसेच प्रदूषण धूळ याने मानवी आरोग्य धोक्यात येऊ लागले आहे प्रशासनाच्या नजरेस आणून दिल्यानंतर प्रशासनाने तात्काळ संबंधित व्यक्तीवर कारवाईचे आदेश देऊन कठोर कारवाई करणे अपेक्षित आहे व ती कारवाई तात्काळ करण्यात यावी अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल याची दखल प्रशासनाने घ्यावी अशी मागणी निवेदनाद्वारे महेंद्र सपकाळ यांनी केली आहे.