जावली प्रतिनिधी
किरण अडसूळ
दि .१५ ऑगस्ट या दिवशी सायंकाळी चार वाजता एसपी ऑफिस सातारा या ठिकाणी हेल्पलाइन या नंबर वरती फोन करून माझ्या आई वडिलांना जिवंत मारले आहे असे हुमगाव येथील शकुंतला दिलीप खंकाळ या महिलेने सांगुन संपूर्ण पोलीस यंत्रणेलाच कामाला लावल्याचे चित्र पाहायला मिळाले परंतु प्रत्यक्षात फोन येताच मेढा पोलीस अंतर्गत कुडाळ पोलीस स्टेशन चे बीट हवलदार शिंदे घटनास्थळी दाखल होताच असे कुठलेही कृत्य घडले नसून फोनवरून पोलिसांची दिशाभूल केल्याचे चित्र शिंदे यांच्या निदर्शनास आले हा फोन चुकीचा होता व दिलेली माहिती चुकीची होती हे सिद्ध झाले होते त्यावरही ही महिला न थांबता पुन्हा दुसऱ्या दिवशी मेढा पोलीस स्टेशनला जाऊन आजूबाजूच्या लोकांची नावे सांगून तक्रार दाखल केली असून सदर महिलेच्या या वर्तणाने पोलीस यंत्रणाच नव्हे तर ग्रामस्थ ही दोन दिवस झाले पण तणावांमध्ये असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे विनाकारण तक्रारी देऊन पोलीस यंत्रणे बरोबर शेजारापाजाऱ्यांना नाहक त्रासाला सामोरे जाण्याची वेळ आलेली पोलिसांनी योग्य योग्य चौकशी करून ग्रामस्थ दोषी आढळल्यास कारवाई करावी अन्यथा सदर महिला ही खोटी तक्रार व नाहक त्रास देत असल्याने सदर महिलेचा पोलिसांनी बंदोबस्त करावा असे ग्रामस्थान कडून सांगण्यात येत आहे, पोलीस सदर प्रकरणाची चौकशी करून ग्रामस्थांच्या नजरेमध्ये दोषा असणाऱ्या मुलींची कारवाई करणार का?

