औरंगाबाद : छत्रपती संभाजी महाराज हे धर्मासाठी जीव देणारे धर्माभीमानी होते, औरंगजेबाने त्यांना सत्तेचे आमिष दाखवले पण ते लाचार नव्हते. (Shivsena) त्यांनी सत्ता लाथाडली आणि जीव गेला तरी धर्म सोडणार नाही, असे ठणकावून सांगितले. त्यानंतर चाळीस दिवस संभाजी महाराजांना हालहाल करून मारण्यात आले. (Aditya Thackeray) आज त्यांची पुण्यतिथी आहे, आजच्या दिवशी तरी औरंगाबादचे नाव संभाजीनगर करण्याला मान्यता द्या.
खड्यात गेली आमदारकी, पक्ष आणि धोरणं या विषयावर आम्ही तुमच्या सोबत आहोत, अशा शब्दात भाजपचे आमदार माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी शिवसेनेला आव्हान दिले. विधीमंडळात काल अर्थसंकल्पावरील चर्चेवर बोलतांना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी औरंगाबादच्या संभाजीनगर नामकरणावरून शिवसेनेला सुनावले होते. दोन ओळीचा ठराव तुम्हाल सभागृहात मांडता येत नाही का? असा टोला लगावला होता.
आज दुसऱ्या दिवशी पुन्हा सुधीर मुनगंटीवार यांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने संभाजीनगरच्या नामकरणावरून शिवसेनेला कोंडीत पकडले. सांस्कृतिक मंत्री अनिल परब किंवा पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी आजच्या दिनी संभाजी महाराजांना आदरांजली म्हणून संभाजीनगरची घोषणा करावी, असे केले तर तुमचे नाव सुर्यासारखे तळपत राहील अन्यथा अंधार निश्चित आहे, असा चिमटा देखील काढला.
सभागृहात विधानसभा अध्यक्षांची विशेष परवानगी घेत मुनगंटीवार यांनी औरंगाबादचे संभाजीनगर नामकरण करण्याच्या विषयावर आपली भूमिका मांडली. मुनगंटीवार म्हणाले, वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी १९८८ मध्ये औरंगाबाद महापालिकेच्या निवडणुकीत २७ नगरसेवक निवडणून आल्यानंतर मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर विजयी मेळावा घेतला आणि तिथे औरंगाबादचे नामकरण संभाजीनगर केल्याची घोषणा केली.
त्यानंतर २०१६ मध्ये राज्य सरकारने बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेसोबत आम्ही या संदर्भातला ठराव सभागृहात संमत केला. आता त्यावरची प्रकिया पुर्ण होऊन तो सांस्कृतिक मंत्री अनिल परब यांच्याकडे आहे. संभाजी महाजांचा इतिहास सगळ्यांना माहिती आहे. धर्मासाठी हालआपेष्टा, क्रुर औरंगजेबाचे अत्याचार सोसून देखील त्यांनी आपला धर्म सोडला नाही. प्राण गेला तरी ते औरंगजेबापुढे झुकले नाही.

