तेटली गावांमध्ये २ ऑक्टोंबर दिनी महात्मा गांधींना अभिवादन करण्याकरिता ग्रामस्थांसह ग्रामसेवक हजर मात्र सरपंच सदस्य गैरहजर आनंद कांबळे यांची सरपंचांवरती कारवाई करण्याची मागणी.



प्रतिनिधी जावली

तेटली गावांमध्ये २ ऑक्टोंबर दिनी महात्मा गांधींना अभिवादन करण्याकरिता ग्रामस्थांसह ग्रामसेवक हजर मात्र सरपंच सदस्य गैरहजर आनंद कांबळे यांची सरपंचांवरती कारवाई करण्याची मागणी

मौजे तेटली येथे दिनांक 28/ रोजी देशाचे क्रांतिकारक महापुरुष भगतसिंग यांची जयंती साजरी करण्याकरिता तेटली ग्रामपंचायतीने पाठ फिरवली होती व ग्रामसेवक तर गैरहजर राहुन फिरायला गेले असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे ऑल इंडिया पॅंथर सेनेचे जावली तालुकाध्यक्ष आनंदा कांबळे यांनी या विषयाची पोलखोल करत ग्रामसेवकांवरती निलंबनाची कारवाई करण्याची पत्राद्वारे जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी केली आहे, व त्यानंतर 29/9/2024 रोजी ग्रामसेवक यांनी स्वतः ग्रामपंचायत मध्ये हजर राहून भगतसिंग यांची जयंती साजरी केल्याची माहिती समजली होती परंतु कागदोपत्री तसला कुठल्याही पुरावा आजही असल्याचा दिसून येत नाही आज दिनांक 2 ऑक्टोंबर दिनी मौजे तेटली तालुका जावली जिल्हा सातारा या ठिकाणी ग्रामपंचायतच्या वतीने महात्मा गांधी यांची 2 ऑक्टोंबर जयंती साजरी करण्यात आली आहे परंतु या जयंतीला चक्क सरपंचांसह सदस्यांनी पाठ फिरवल्या ची धक्कादायक माहिती समोर आली आहे., आज सकाळी गावामध्ये 2 ऑक्टोंबर महात्मा गांधी यांची जयंती साजरी करण्यासाठी सर्व गावातील लोक जमले होते परंतु जयंती ही शासकीय नियमानुसार पार पडली गेली महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले परंतु या कार्यक्रमाला चक्क तेटली ग्रामपंचायतीच्या सरपंच व काही सदस्य हे चक्क गैरहजर असल्याचे बाब आनंद कांबळे यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी सरपंच यांच्याशी संपर्क साधला परंतु सरपंच हे फिरायला गेले असल्याचे सांगून सरपंचांनी फोन कट केला आनंद कांबळे यांनी लढा महाराष्ट्रा चा प्रतिनिधींशी बोलताना सांगितले की तेटली गावामध्ये आजही हुकुमशाही आहे या ग्रामपंचायतीमार्फत तुच्छदिशी वागणूक ही पूर्वीपासून या ठिकाणी वंचितांना दिली जाते महापुरुषांचा वारंवार अपमान केला जातो तेटली ग्रामपंचायत मध्ये महापुरुषांच्या प्रतिमेला स्थान नाही मात्र गावातील काही जमीनदार पाटलांच्या फोटोला स्थान आहे हे या ग्रामपंचायतीचे दुर्दैव आहे, आणि म्हणून आज सरपंच गैरहजर राहून यांनी आज आणखी एक महापुरुषांच्या विचाराला आपला विरोध असल्याचा पराक्रम दाखवलेला असल्याने या ठिकाणी ऑल इंडिया पॅंथर सेनेच्या वतीने जावली तालुका अध्यक्ष या नात्याने मी या ठिकाणी तेटली गावच्या सरपंचांचा निषेध करतो व सरपंचांवरती तात्काळ निलंबनाची कारवाई करण्यात यावी ही आपल्या माध्यमातून जिल्हाधिकाऱ्यांना व सातारा जिल्हा परिषद मुख्याधिकाऱ्यांना विनंती करतो की ताबडतोब सरपंचांवरती कारवाई करून त्यांचे सरपंच सदस्यव रद्द करण्यात यावे अशी मागणी ऑल इंडिया पॅंथर सेनेचे जावली तालुकाध्यक्ष आनंद कांबळे यांनी लढा महाराष्ट्र शी बोलताना केली आहे.