15 ऑगस्ट दिवशी सातारा जिल्हाधिकारी कार्यालय गाजले जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर पाकिस्तानचे नाव असणारा सातबारा फाडून ऑल इंडिया पॅंथर सेनेकडून सातारा महसूल विभागाचा निषेध.



प्रतिनिधी पांचगणी १६-८-२०२४

15 ऑगस्ट दिवशी सातारा जिल्हाधिकारी कार्यालय गाजले जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर पाकिस्तानचे नाव असणारा सातबारा फाडून ऑल इंडिया पॅंथर सेनेकडून सातारा महसूल विभागाचा निषेध.

पांचगणी येथील सर्वे नंबर 128/ मध्ये पाकिस्तान असा उल्लेख असणारा सातबारा ऑल इंडिया पॅंथर सेनेच्या वतीने 76 व्या 15 ऑगस्ट अमृत महोत्सव दिना दिवशी सातारा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर फाडण्यात आला असून ऑल इंडिया पॅंथर सेनेच्या वतीने सदर महसूल प्रशासनाचा निषेध नोंदवत पाकिस्तान मुर्दाबाद मुर्दाबाद हिंदुस्तान जिंदाबाद अशा घोषणा देण्यात आल्या महसूल प्रशासनातील पाकिस्तानचे 2019 साली पाकिस्तान अशी फेरनोद सातबार्या वरती नोंदवणाऱ्या मंडल अधिकारी सर्कल यांच्यावरती देशद्रोहाचा खटला दाखल करा पाकिस्तानचा उल्लेख असणाऱ्या जागेवरती पाचगणी येथील निवेरा शाळा ही उभी आहे त्या शाळेच्या संस्थेच्या लोकांची चौकशी करा शाळेतून मिळणारे उत्पन्न हे देशाच्या विरुद्ध कटकारस्थाने करण्याकरिता वापरण्यात येते का? याची चौकशी करा आपल्या सातबार्या वरती पाकिस्तान असा उल्लेख असताना देखील पाकिस्तान प्रेमींनी या भारतात राहून पाकिस्तान नावाच्या विषाला खतपाणी घातल्या प्रकरणी देशद्रोहाचे खटले संबंधित संस्थेच्या संस्थाचालकांवरती दाखल करा निवेरा संस्थाचालकांची आंतरराष्ट्रीय दहशतवादी विरोधी पथकाकडून चौकशी करा या मागणीकरिता 15 ऑगस्ट दिना दिवशी ऑल इंडिया पॅंथर सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय सातारा या ठिकाणी या मागण्यांकरिता आंदोलन करून पाकिस्तान नावाचा उल्लेख असणारा सातबारा जाळण्यात आला यावेळी जिल्हाध्यक्ष आदित्य गायकवाड अनमोल कांबळे आशिष मोरे लक्ष्मण पोळ राहुल रोकडे सुशांत वायदंडे सिद्धार्थ गायकवाड इतर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते .