ग्रामस्थ दांडेघर व गोखले वकील यांनी घेतलेली पत्रकार परिषद म्हणजे बदनामी करण्याचा डाव पल्लवी चिडगुपकर आमची बहीणच काही ग्रामस्थ आमच्यासोबत सुहास वाकडे.,
पाचगणी प्रतिनिधी
गेल्या दोन-चार दिवसांपासून माजी व माझ्या वकिलांची बदनामी करण्याचं काम ग्रामस्थ मंडळ दांडेघर यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सुरू केल आहे ग्रामस्थ यांनी पहिलं सांगितलं की सुहास वाकडे रविराज जोशी यांनी संपूर्ण दांडेघर गाव हे विकल आहे परंतु त्यांच्याकडे जर का दस्ताची कॉफी असेल तर ती त्यांनी सादर करावी., त्याच प्रकारे त्यानंतर ते महाबळेश्वर मेहरबान न्यायालयामध्ये जाऊन या सर्व प्रकरणाची चौकशी करावी असे म्हटले व त्याला मीही सहमती दिल्यामुळे मेहरबान न्यायालयाने चौकशीचे आदेश दिलेले आहेत त्याच प्रकारे 30 ऑगस्ट पर्यंत चौकशी पूर्ण होईल सत्य बाहेर पडेल परंतु त्यानंतर आमच्यातर्फे देखील महाबळेश्वर मेहरबान न्यायालयामध्ये दावा दाखल करण्यात येणार आहे, की गावातल्या किती ७/१२ वरती इतर हक्कात असणाऱ्या लोकांनी मूळ आमच्या मालकीच्या असणाऱ्या मिळकती या लीज एग्रीमेंट वरती रजिस्टर नोटरी वरती किती लोकांना विकल्या व त्यातून कशाप्रकारे बोगसरित्या पैशांची करोड रुपयांची अफरातफर झाली याची पोलखोल करून देवस्थान जागेचा मूळ मालकाला न विचारता परस्पर व्यवहार केल्याप्रकरणी ज्या भोगवटदार ग्रामस्थांनी जागा विकल्या त्यांच्यावरती गुन्हे दाखल करण्याकरिता मेहरबान न्यायालयाचे व पोलिसांचे दरवाजे आम्ही ठोठावणार आहोत वेळ पडल्यास उच्च न्यायालयामध्ये सूद्धा दावा दाखल करून बोगस रित्या देवस्थानच्या जमिनी विकणाऱ्या भोगवटदार वर्ग
असणाऱ्या ग्रामस्थांवरती गुन्हे दाखल करणार आहोत व त्या संदर्भातले सर्व रजिस्टर दस्तऐवज हे आम्ही ग्रामपंचायत इथून उपलब्ध करून घेतले आहेत कारण मौजे दांडेघर गावचा मूळ मालक हा सुहास वाकडेच असून पल्लवी चिडगुपकर ही माझी बहीण आहे व आमचे वाद हे केवळ ट्रस्ट संदर्भात चालू आहेत ज्या ट्रस्टमध्ये वाकडे कुटुंबाचे चार तर इतर सदस्य तीन असे सात लोकांच्या कमिटीसाठीचा हा वाद गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असून व त्या संदर्भात पल्लवी चिडगुपकर यांचा ट्रस्टमध्ये व इतर प्रकरणांमध्ये म्हणणे ऐकून घेण्याकरीताचा अर्ज हा फेटाळण्यात आला होता त्या अर्जा च्या अनुषंगाने आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये गेलो होतो परंतु सुप्रीम कोर्टाने पल्लवी चिडगुपकर यांचे म्हणणे ऐकून घ्या असे आदेश दिले होते त्यानंतर पल्लवी चिडगुपकर यांचे म्हणणे ऐकून घेण्यात आले व त्यांचा अर्ज नामंजूर करून तो दावा त्या वेळेस त्या पूर्णपणे हरलेल्या आहेत व सुहास वाकडे 17 दावे जागे संदर्भात जिंकले आहेत याचे न्यायालयीन आदेश आमच्याकडे आहेत ते आम्ही चौकशी दरम्यान सादर करणार आहोत हे खरं वास्तव ग्रामस्थ व त्यांचे वकील असणारे गोखले लोकांसमोर का मांडत नाहीत ही वस्तुस्थिती आहे, परंतु माझी व माझ्या वकीलांची बदनामी करण्याचा डाव काही लोकांनी आखलेला आहे व त्या गावामध्ये सर्व ग्रामस्थ आमच्या विरोधात नसून आमच्या सोबत आहेत परंतु काही मोजक्याच ग्रामस्थ लोकांनी आमची बदनामी करण्याची सुपारी घेतली असून त्यांना योग्यरित्या योग्य वेळेस कायद्यानुसार समज दिली जाईल पल्लवी चिडूगुपकर यांना जरी जागा मिळाली आणि सुहास लक्ष्मण वाकडे यांना जरी संपूर्ण गाव मिळालं तरी ते वाकडे कुटुंबीयांचच राहणार आहे ग्रामस्थांचं होणार नाही असे सुहास वाकडे यांनी सांगितलं,

