मी हजारो किलोमीटरचा प्रवास करत माझ्या दलित समाजातील बहिणीला भेटायला आलेलो आहे, इथे असणारा आमदार खासदार तीन दिवस झाले तरीही दलित कुटुंबाला भेट देत नाही आमची मते चालतात पण दुर्दैव आहे आम्ही चालत नाही, राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार साताऱ्यात कडाडले,



मी हजारो किलोमीटरचा प्रवास करत माझ्या दलित समाजातील बहिणीला भेटायला आलेलो आहे, इथे असणारा आमदार खासदार तीन दिवस झाले तरीही दलित कुटुंबाला भेट देत नाही आमची मते चालतात पण दुर्दैव आहे आम्ही चालत नाही, राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार साताऱ्यात कडाडले,

प्रतिनिधी
अनमोल कांबळे

सातारा जिल्ह्याच्या भूमीतली माण तालुक्यातील घटना ही मानवतेला काळिंबा फसणारी घटना आहे, एवढेच नाही तर ही मणिपूरची पुनरावृत्ती आहे की काय ? असा असणारा प्रश्न उपस्थित होतो त्या दिवशी जर का त्या महिलेच्या अंगावरचे कपडे फाडले असते तर दुसरी मणिपूरची घटना या सातारा जिल्ह्यामध्ये घडली असती परंतु दुर्दैव आहे, घटना घडते गावाच्या चावडी वरती घटना घडते भर चौकामध्ये घटना घडते तरीही तेथील असणारा एकही नागरिक समोर मारहाण चालू असणाऱ्या पीडित महिलेला वाचवण्याकरिता येत नाही यातूनच कळतं की हा जातीयतेचा विषाणू डोक्यामध्ये असणारा दलितांच्या विषयाचा तिरस्कार हा या जिल्ह्यामध्ये किती मोठ्या प्रमाणात आहे, आज गावामध्ये घराघरांमध्ये मातंग समाज हा भयभीत झालेला आहे दलित समाज हा भयभीत झालेला आहे, कधीही या क्रांतीकारी जिल्ह्यामध्ये दलितांचे मुद्दे पडू शकतात घटना घडते तरी देखील तिथे असणारा ए पी आय उपस्थित राहत नाही जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक समीर शेख यांना ज्यावेळेस घटनेची कल्पना दिली जाते त्यावेळेस तिथे असणारा ए पी आय हा उपस्थित राहतो सकाळी दहा च्या घटनेची तक्रार रात्री दहा वाजता नोंदवली जाते याच्यावरूनच कळतं की गावातल्या त्या मारहाण करणाऱ्या गाव गुंडांची दहशत आणि त्यांच्या डोक्यावरती हात असणाऱ्या जातीयतेचा दबाव इथल्या यंत्रणेवरती किती मोठ्या प्रमाणात होता मी हजार किलोमीटरचा प्रवास करत माझ्या बहिणीला भेटायला आलेलो आहे, FIR पाहिल्यानंतर घटनेतील एक पिढीत हा अल्पवयीन आहे आणि त्यामुळे पॉस्को अंतर्गत देखील कारवाई ही झाली पाहिजे अशी असणारी आमची प्रामुख्याने मागणी आहे तुम्हाला आमची मते चालतात परंतु आमच्या समाजावर झालेला अन्याय तुम्हाला दिसत नाही ही दुर्दैवाची गोष्ट आहे, घटना घडल्यापासून आज तीन दिवस झाले तरी देखील एकही लोकप्रतिनिधी आमदार खासदार मंत्री या पिढीत महिलेला भेट द्यायला आलेला नाही, मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यांमध्ये जर काही अवस्था असेल तर इतर जिल्ह्यांचा आपण अंदाज ही लावू शकत नाही आणि म्हणून तात्काळ पिढीत कुटुंबाला सामाजिक न्याय विभागामार्फत चार एकर जागा उपलब्ध करून द्या. पीडित कुटुंबातील घरातल्या एकाला शासकीय सेवेत रुजू करुन त्यांचा सन्मान करा इथून पुढे जर का अशी घटना घडली तर जशास तसे उत्तर दिल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही, असे ऑल इंडिया पॅंथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार हे आज सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावरती असताना बोलत होते,