आंब्रळ ग्रामपंचायतचा भोंगळ कारभार समोर आणणार असल्याच्या भीतीमुळे सरपंच आणि सदस्यांचे माझ्याविरुद्ध षडयंत्र उमेश जाधव उपसरपंच..
प्रतिनिधी
अनमोल कांबळे
आंब्रळ गावचा भ्रष्टाचार मी बाहेर काढणारच आंब्रळ येथील हजारो वर्षांपासून गावाला पाणीपुरवठा करणारी विहीर मुजवून गावाला पाण्यापासून वंचित ठेवण्याचे षडयंत्र गावच्या सरपंच व काही सदस्यांचे होते व नवीन विहीर जागा उपलब्ध नसताना खोदून 30 ते 35 लाखाचा निधी मंजूर करून तो लाटायचा देखील यांचा प्रयत्न होता परंतु त्याला मी विरोध केला असल्याने व तसेच ग्रामपंचायतच्या लेटरहेड वरती चुकीचे ठराव करून बाहेरून येणाऱ्यांना अनाधिकृत बांधकामांचे आठ अ चे उत्तरे तयार करून ना हरकत दाखले देणे अतिक्रमण करणाऱ्यांना अभय देण्याचे काम ग्रामपंचायत काही सदस्य व सरपंचांकडून चालू होते मुख्य विकासकांमाना बाजूला ठेवले जात होते व त्या संदर्भात मी वेळोवेळी आवाज देखील उठवला होता परंतु माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न वारंवार होत असून मी तो हाणून पाडत होतो मात्र 15 ऑगस्ट दिवशी राष्ट्रध्वजाचा झालेला अपमान मी कदापि सहन करू शकणारा नव्हतो व तिथे मी विरोध देखील केला व आवाज उठवला त्याचाच मनामध्ये राग धरून सरपंच गटाच्या सदस्यांनी व सरपंचांनी माझ्यावरती अविश्वास ठराव आणला परंतु अशा ठरावाला आपण भीक घालत नसून माझं ध्येय राजकारण नसून समाजकारण आहे, समाजातील प्रत्येक घटकापर्यंत विकास पोहोचला पाहिजे हे धोरण मी हातामध्ये घेतलेला आहे, ग्रामपंचायत सदस्य अथवा उपसरपंच इतकंच माझं कर्तव्य नाही आणि म्हणून शेवटच्या क्षणापर्यंत सर्वसामान्य गावातल्या भूमिपुत्राचा विकास हाच उमेश जाधव चा ध्यास राहणार आहे, व वेळ आल्यास वेळोवेळी गाव पातळीवरती केलेला भ्रष्टाचार मी बाहेर काढणार आहे, असे उपसरपंच उमेश जाधव यांनी सांगितले…

